मिनी ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:46+5:302021-07-09T04:23:46+5:30
पावसाची प्रतीक्षा धुळे : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली व पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातुर झाले ...

मिनी ट्रक उलटला
पावसाची प्रतीक्षा
धुळे : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली व पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. बहुतेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीदेखील वाया जाणार.
निर्बंध नावालाच
धुळे : शहरातील निर्बंध नावालाच असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मास्क वापरणेही काहींनी बंद केले.
लसीकरणासाठी रांगा
धुळे : जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. शहरातील लसीकरण केंद्राबाहेर सकाळी ५ वाजेपासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र पुरेशा डोसअभावी बहुतेक नागरिकांना परत जावे लागत आहे.
नारळांचा खच
धुळे : देवपुरातील दत्त मंदिर चाैकात एका खासगी रुग्णालयाजवळ रिकाम्या नारळांचा खच साचला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंध येत आहे. यात पाणी साचल्यास डासांचा प्रादुर्भाव वाढेल.