मनपाने दिवाळीपूर्वी दिवे लावावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:27+5:302021-09-23T04:41:27+5:30
महापाैरांच्या दालनात बुधवारी विद्युत विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापाैर प्रदीप कर्पे, माजी महापाैर चंद्रकांत साेनार, आयुक्त देविदास ...

मनपाने दिवाळीपूर्वी दिवे लावावेत
महापाैरांच्या दालनात बुधवारी विद्युत विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापाैर प्रदीप कर्पे, माजी महापाैर चंद्रकांत साेनार, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसेवक हर्षकुमार रेलन, युवराज पाटील, संतोष खताळ, रावसाहेब नांद्रे, भिकन वराडे, गुलशन उदासी, सुनील बैसाणे तसेच अभियंता कैलास शिंदे, विद्युत अभियंता नरेंद्र बागुल व ठेकेदारांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
शहरात तीन महिन्यांपासून एलईडी लाईट बसवण्याच्या कामास प्रारंभ झालेला आहे. आजतागायत पूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे प्रमुख मार्ग व प्रभागनिहाय काम सुरू आहे. यात सुमारे सहा हजार विद्युत पथदिवे बसवण्यात आलेले आहेत. कामाची गती व नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता ठेकेदाराने मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. कमी वेळेत जास्त पथदिवे कसे बसविता येईल, याकडे लक्ष द्यावे. बंद पथदिव्यांसाठी एक स्वतंत्र पथक नियुक्तीबाबत कार्यवाही करणे तसेच देवपूर व शहर भागासाठी दोन स्वतंत्र पथक नियुक्त करून त्यांच्यामार्फत या भागातील नवीन पथदिवे बसविणे तसेच देवपूर व शहरी भागासाठी स्वतंत्र संपर्क कार्यालय व स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.