वेल्हाणे येथे नाला खोलीकरणामुळे अडवले गेले लाखो लिटर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:38 IST2021-09-26T04:38:55+5:302021-09-26T04:38:55+5:30
धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावाच्या शिवारामध्ये इंजा नाला व जामने शिवारातील नाल्यावर जलयुक्त शिवाराची कामे झालेली नव्हती. त्यामुळे ...

वेल्हाणे येथे नाला खोलीकरणामुळे अडवले गेले लाखो लिटर पाणी
धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावाच्या शिवारामध्ये इंजा नाला व जामने शिवारातील नाल्यावर जलयुक्त शिवाराची कामे झालेली नव्हती. त्यामुळे पावसाचे येणार सर्व पाणी वाहून जात होते आणि उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. या दोन्ही नाल्यांवर जलयुक्त शिवार असो किंवा इतर योजनेच्या माध्यमातून शासनाने नाला खोलीकरण करावे व नवीन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करावी यासाठी गावातील सामाजिक संस्था स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेने वेळोवेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व आमदार यांना निवेदने दिली. त्यानुसार नाल्यांवरील जलयुक्त शिवाराचे काम गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पाणलोट विभागाला मिळाले. या पाणलोट विभागामार्फत या नाल्यांचे खोलीकरण करून त्यावर कोल्हापुरी सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे लाखो लिटर पाणी याद्वारे अडवले गेले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या नाल्यांवर खोलीकरण व्हावे यासाठी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार सचिव प्रवीण बोरसे उपाध्यक्ष अनिल शिंदे, आनंदा मराठे, अविनाश वाघ, प्रदीप मोरे, स्वप्नील पवार, संदीप मोरकर, राजू पाटील आदी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती. गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या पाणलोट विभागामार्फत हे काम पूर्ण केल्याबद्दल शेतकरी व गावकरी हे पाणलोट विभागाचे व गावातील पाणलोट समितीचे सदैव आभारी राहतील, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.