शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाजरी संशोधन केंद्राने केले चौथे वाण विकसित, देशातील नऊ राज्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 08:07 IST

आहारात लोह आणि जस्ताचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. लोहाचे प्रमाण कमी असल्यास मानवाच्या शारिरिक वाढ व मानसिक क्षमतेवर परिणाम होतो.

ठळक मुद्देकृषी महाविद्यालय धुळे येथील बाजरी संशोधन केंद्राने एम.एच २११४ (डी.एच.बी.एच.१३९७) हे बाजरीचे नवीन वाण विकसित केले आहे. महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणासह देशातील नऊ राज्यांसाठी हे संकरित वाण विकसित केले आहे.ज्या अवर्षणप्रवण क्षेत्रात ४०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याक्षेत्रासाठी हे वाण अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

अतुल जोशी

धुळे - आहारात लोह आणि जस्ताचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. लोहाचे प्रमाण कमी असल्यास मानवाच्या शारिरिक वाढ व मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. तर जस्ताच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. यावर उपाय म्हणून कृषी महाविद्यालय धुळे येथील बाजरी संशोधन केंद्राने एम.एच २११४ (डी.एच.बी.एच.१३९७) हे बाजरीचे नवीन वाण विकसित केले असल्याची माहिती बाजरी संशोधन योजनेतील रोप पैदास शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. तथा संशोधक डॉ. एच.टी.पाटील यांनी दिली.

मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या जीवनसत्वासोबतच खनिज पदार्थांचीही आवश्यकता असते. खनिज पदार्थांमध्ये लोह व जस्ताचे प्रमाण हे सुध्दा महत्वाचे आहेत. भारतात ८० टक्के गर्भवती स्त्रिया, ५२ टक्के इतर स्त्रीया व ७४ टक्के ६ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये लोहाचा तर ५२ टक्के लहान मुलांमध्ये जस्ताची कमतरता आढळून आलेली आहे.

बाजरी हे आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीत लोह व जस्त अधिक प्रमाणात असते. हाच उद्देश लक्षात घेऊन, आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इक्रिसॅट) व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, धुळे येथील बाजरी संशोधन योजना यांनी संयुक्त विद्यमाने ‘धनशक्ती आणि महाशक्ती’ हे दोन तर बाजरी संशोधन योजना धुळे यांनी ‘आदिशक्ती’ हे वाण यापूर्वी विकसित केलेले आहे.

नवीन वाण विकसित

आता धुळ्याच्या बाजरी संशोधन योजना यांनी सन २०१८ मध्ये एम.एच.२११४ (डी. एच. बी. एच. १३९७) हे संकरित वाण विकसित केले आहे. महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणासह देशातील नऊ राज्यांसाठी हे संकरित वाण विकसित केले आहे. ज्या अवर्षणप्रवण क्षेत्रात ४०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याक्षेत्रासाठी हे वाण अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

या वाणाचा लागवडीचा कालावधी १५ जून ते १५ जुलै असा आहे. प्रति एकरासाठी दीड किलो बियाणे लागत असून, पिकाचा कालावधी ७८ ते ८० दिवसांचा आहे. एका हेक्टरमध्ये ३४ ते ३५ क्विंटल उत्पन्न देणारे हे वाण आहे. या वाणाचे वैशिट्य म्हणजे लांब कणीस असून, ठोकळ व राखी रंगाचा दाणा आहे. हे वाण ‘गोसावी’ रोगास प्रतिबंध करीत असते. बाजरीचे हे संकरित वाण विकसित करण्यासाठी डॉ. व्ही.वाय. पवार, डॉ. आर.के. गवळे, डॉ. सी.एच. ठाकरे, डॉ.एन.एस. उगले, एम.जे. गावीत, यांचेही सहकार्य लाभले आहे.बाजरीचे नवीन संकरित वाण महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांसाठी विकसित केले आहे. यामुळे धुळ्याच्या बाजरा संशोधन केंद्राचे नाव देशपातळीवर उंचावले आहे.

- डॉ.एच.टी. पाटील, बाजरी पैदासकार, बाजरी संशोधन योजना, कृषी महाविद्यालय, धुळे.

 

टॅग्स :DhuleधुळेagricultureशेतीHealthआरोग्य