धुळे तालुक्यातील वडजाई यात्रोत्सवात लाखोची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:12 IST2019-05-17T12:09:58+5:302019-05-17T12:12:10+5:30
वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथील चार कुळांची कुलदैवत व वडजाई गावाची ग्रामदैवत असलेल्या वडजाई मातेच्या यात्रा उत्सवानिमित्ताने ...

dhule
वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथील चार कुळांची कुलदैवत व वडजाई गावाची ग्रामदैवत असलेल्या वडजाई मातेच्या यात्रा उत्सवानिमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल झाली.
बारागाडे व कुस्त्यांची दंगल हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले आहे. रविवार १२ मेपासून यात्रा उत्सवास सुरुवात झाली. यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. नवसाला पावणारी देवी म्हणुन ख्याती असल्याने भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रेत लहान मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. त्यात संसारपयोगी वस्तु, प्रसाधनाची दुकाने, विविध प्रकारचे पाळणे, नारळ पुजा साहित्य विक्रेते, खेळणी दुकाने, हॉटेल व्यावसायिक अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. या खरेदी विक्रीतून दोन दिवसात लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी बारागाडे ओढण्यासाठी योगेश निकम यांची निवड झाली होती.
सायंकाळी साडेसहा वाजता बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी याचा आनंद घेतला. यात्रेनिमित्ताने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मोठे भांडयासह रोख रक्कमेचे बक्षिस देण्यात आले.
यात धुळे, दोडाईचा, मालेगाव, शिरपूर गावातील मल्लांनी उपस्थिती दिली. यात्रेत काही अप्रीय घटना घडु नये म्हणून मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट हवालदार जाधव यांच्या सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.