प्रतापगडावर जिवाजी महाले यांचे स्मारक बांधावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:51 IST2019-11-12T18:50:54+5:302019-11-12T18:51:10+5:30
अ.भा.जिवा सेनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

प्रतापगडावर जिवाजी महाले यांचे स्मारक बांधावे
आॅनलाइन लोकमत
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून स्मारक बांधण्यासाठी ठराव झालेला आहे. तसेच या स्मारकासाठी ०.१५ जागा व त्या स्मारकासाठी पावणेतीन कोटींचे अंदाजपत्रक मंजूर झालेले आहे. १४ जानेवारी २०२० रोजी जिवा महालेंच्या स्मृतिदिनी स्मारकाचे भूमिपूजन झाले पाहिजे.
गेल्या १५ वर्षांपासून जिवासेना या मागणीसाठी संघर्ष करीत आहे. येत्या १४ जानेवारीपर्यंत जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भूमिपूजन करून कामाची सुरूवात न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद केलेले आहे.
निवेदन देतेवेळी राष्टÑीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले, समाधान निकम, भगवात चित्ते, सुधीर महाले, गणेश ठाकरे, ओंकार येशी, मनोज गोरगावकर, वसंत चित्ते, तुषार सैंदाणे, राहूल सूर्यवंशी यांच्यासह जिवा सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा मनिषा चित्ते, शहराध्यक्षा वैशाली सैंदाणे, छाया महाले, कल्याणी ठाकरे, ज्योती महाले, कल्पना चित्ते, त्रिवेणी सोनवणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होेत.