मेलाणे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:40+5:302021-01-13T05:33:40+5:30
मेलाणे येथील ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवारांचे भवितव्य ६९८ मतदारांच्या हाती आहे. यात वॉर्ड क्रमांक १ मध्ये ३, वॉर्ड ...

मेलाणे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस
मेलाणे येथील ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवारांचे भवितव्य ६९८ मतदारांच्या हाती आहे. यात वॉर्ड क्रमांक १ मध्ये ३, वॉर्ड क्रमांक २ मध्ये २, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये २ अशा एकूण ७ जागांसाठी १४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. मागील पंचवार्षिक उपसरपंच असणारे विजय प्रकाश बोरसे यांच्या पॅनलची सरळ लढत राजाराम गंगाराम बोरसे यांच्या पॅनलशी होत आहे. सर्व उमेदवारांनी होम टू होम जाऊन प्रचार सुरू केला आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन लक्ष असू द्या, अशी विनंती उमेदवार करीत आहेत. या ग्रामपंचायतीत दोन पॅनलची सरळ लढत होत असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर परिसराचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आता लागलेली आहे. या निवडणुकीत विशेष करून तरुणांनी पुढाकार घेतला आहे. नेमकी कुणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.