शिर्डी येथे आज तेली समाजाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:39+5:302021-02-07T04:33:39+5:30
अखिल भारतीय तेली साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षीरसागर हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत़ यावेळी माजी ...

शिर्डी येथे आज तेली समाजाची बैठक
अखिल भारतीय तेली साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षीरसागर हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत़ यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, विजय चौधरी, विक्रांत चांदवडकर, कृष्णराव हिंगणकर यांच्यासह राज्यातील आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळावा व बैठक ७ रोजी सकाळी ११ वाजता संकल्पसिद्धी लॉन्स शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. बैठकीनंतर लगेचच समाजाच्या राजस्तरीय मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. यात राज्य कार्यकारिणीचे जी.एम.जाधव, सुखदेव वंजारी, श्यामकांत ईशी, डॉ. अरुण भस्मे, बद्रीनाथ लोखंडे, विजय काळे हे उपस्थित राहणार आहेत़ या मेळाव्यासाठी राज्यातील तेली समाज बांधव-भगिनी व प्रांतिक तेली समाज महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत़ या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी यांनी केले आहे.
शिरपुरात आज सैनिकाचा सत्कार सोहळा
शिरपूर : भारतीय सैन्य दलातील जवान धीरज मधुकरराव सनेर हे १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले़ त्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़
७ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील सुभाष कॉलनीतील बनुमाय शाळेच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे़
धीरज सनेर हे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात नोकरीला होते़ ते नुकतेच सेवानिवृत्त झालेत़ त्यानिमित्त सेवापूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ उपस्थित राहण्याचे आवाहन शिव छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, सनेर परिवार, पाटीलवाडा मित्र मंडळ, माजी सैनिक ग्रुप व शिरपूर ग्रीन आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे़
शिरपुरात आज पाटील समाजाचा वधू-वर मेळावा
शिरपूर : सकल मराठा पाटील समाजाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़
७ रोजी सकाळी १० वाजता येथील स्वा़ सै़ शंकरनाना लॉन्सच्या मैदानावर हा मेळावा घेण्यात आला आहे़ मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत दामोधर पाटील हे राहणार आहेत़ यावेळी खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, गटनेता कामराज निकम, सुरतचे प्रकाश पाटील, नगरसेवक मोहन पाटील, शिसाका चेअरमन माधवराव पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर पाटील, माजी आमदार शरद पाटील, श्याम सनेर, किशोर पाटील, दीपक पाटील, शुभांगी पाटील, संगीता देवरे, अॅड. ललिता पाटील, सरलाबाई पाटील, कुसुम पाटील, साधना पवार, स्वाती चव्हाण, गुलाबराव पाटील, हेमंत पाटील, संजिवनी सिसोदे आदी उपस्थित राहणार आहेत़
उपस्थित राहण्याचे आवाहन सकल्प चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व वधू-वर परिचय मेळावा कार्यकारिणी मंडळाने केले आहे़