मालपूर गटात उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:23+5:302021-09-23T04:41:23+5:30

सकाळपासून मोजक्या आपापल्या कार्यकर्त्यांना घेत शक्तिप्रदर्शन न करता हे संभाव्य उमेदवार गटात फिरत असून, एक फेरी पूर्ण केल्याचे समजते. ...

Meeting of candidates in Malpur group started | मालपूर गटात उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू

मालपूर गटात उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू

सकाळपासून मोजक्या आपापल्या कार्यकर्त्यांना घेत शक्तिप्रदर्शन न करता हे संभाव्य उमेदवार गटात फिरत असून, एक फेरी पूर्ण केल्याचे समजते. प्रत्येकाची मनधरणी करून आपल्याकडे वळविण्याचा हालचाली सध्या जोर धरू लागल्या आहेत.

गटातील या संभाव्य उमेदवारांनी गटातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांचा काय कौल आहे हे जाणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे प्रचाराची पहिली फेरी गटात पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. हा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. काही रुसवे फुगवे काढून आपल्या गोटात कोण, कसा सामील होईल, यासाठी सध्या जोर दिला जात असल्याचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गावात दिसून येत आहे.

या पोटनिवडणुकीत ११ हजार ७२४ पुरुष व ११ हजार ३७७ स्त्रिया असे एकूण २३ हजार १०१ मतदार हे मतदार नवीन सदस्य निवडणार आहेत.

220921\img-20210705-wa0014.jpg~220921\img-20210705-wa0032.jpg

मालपूर येथील दरबार गडावर आपल्या समर्थकांसह महावीरसिंह रावल.~मालपूर येथील धवल दुध डेअरीच्या प्रांगणात आपल्या समर्थकांसह महाविकास आघाडी उमेदवार हेमराज पाटील.

Web Title: Meeting of candidates in Malpur group started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.