धुळ्यातील देवपूर भागातून मांस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:24 IST2018-08-23T12:23:35+5:302018-08-23T12:24:19+5:30

कारवाई : एकाला घेतले ताब्यात

Meet caught in the Dhupul from Devpur area | धुळ्यातील देवपूर भागातून मांस पकडले

धुळ्यातील देवपूर भागातून मांस पकडले

ठळक मुद्देदेवपूर भागातून पकडले मांसपोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील देवपूर भागातून पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरुन एका घरात पोलिसांनी छापा टाकला़ मांस जप्त करण्यात आले आहे़ त्याची तपासणी केल्यानंतरच हे मांस कोणाचे याचा उलगडा होणार आहे़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले़ 
देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळील नूर नगरातील मागच्या बाजूस एका घरात मांस असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली़ माहिती मिळताच देवपूर पोलीस निरीक्षक दत्ता पवार आणि पोलिसांच्या पथकाने त्या घरात छापा टाकला़ त्यात मांस जप्त करण्यात आले असून ते सुमारे ३० ते ४० किलो असल्याचे सांगण्यात येत आहे़ पकडण्यात आलेले मांस हे कोणाचे आहे याची तपासणी केली जाणार आहे़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांची कारवाई सुरु आहे़ पोलिसांनी जप्त केलेले मांस हे रिक्षाची मदत घेऊन पोलीस ठाण्यात आले आहे़ पुढील कारवाई सुरु आहे़ 

Web Title: Meet caught in the Dhupul from Devpur area