उपजिल्हा रुग्णालयात औषधे उपलब्ध करून द्यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:32+5:302021-03-27T04:37:32+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा उपद्रव वाढत चालला आहे. शिंदखेडा तालुक्यात तर त्याचा मोठा उद्रेक झाला आहे, दोंडाईचा व शिंदखेडा शासकीय रुग्णालयात ...

उपजिल्हा रुग्णालयात औषधे उपलब्ध करून द्यावीत
जिल्ह्यात कोरोनाचा उपद्रव वाढत चालला आहे. शिंदखेडा तालुक्यात तर त्याचा मोठा उद्रेक झाला आहे, दोंडाईचा व शिंदखेडा शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहेत. अशातच कोरोनाग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा भासत असून, औषधांअभावी रुग्णांची प्रकृती ढासळत जाऊन रोज अनेक रुग्ण आपला जीव गमावत आहेत. परंतु प्रशासन पाहिजे तशा उपाययोजना करण्यात कमी पडत आहे. शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ व चिमठाणे ही गावे हॉटस्पॉट झाली आहेत. आज अनेक रुग्ण या गावांत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक जण आपले स्वॅब देण्यासही टाळाटाळ करीत आहेत. तर काही जण घरी राहूनच औषधोपचार करीत आहेत. अनेकदा सांगूनही दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा पुरवठा करण्यात जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासन अपयशी ठरत असून लवकरात लवकर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने येत्या काही दिवसांत औषधपुरवठा न केल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशाराही आ. रावल यांनी दिला आहे.