वैद्यकीय अधिका-यासह परिचरही जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 19:10 IST2019-05-30T19:08:50+5:302019-05-30T19:10:25+5:30

कापडणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

A medical officer, along with the attendant net | वैद्यकीय अधिका-यासह परिचरही जाळ्यात

वैद्यकीय अधिका-यासह परिचरही जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवृत्त रुग्णवाहिका चालकाचे मंजूर होणाºया बिलातून लाचेची मागणी करणाºया वैद्यकीय अधिकारी आणि लाच स्विकारणारा परिचर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी रंगेहात पकडले़ 
कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा चालक हा सेवानिवृत्त झालेला आहे़ त्याने त्याच्या मंजूर झालेले प्रवासभत्ता व ओव्हरटाईम बिलाचे मोबदल्यात वैद्यकीय अधिकारी डॉ़ जयश्री ठाणसिंग ठाकूर यांनी ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ त्यानंतर तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती़ तक्रारीच्या अनुषंगाने २८ मे रोजी पडताळणी करण्यात आली़ 
तडजोडीअंती ५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याने गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला़ 
वैद्यकीय अधिकारी जयश्री ठाकूर यांच्या सांगण्यावरुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे परिचर दिलीप देवराम निकुंभे यांनी ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले़ या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ 
नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील जयंत साळवे, संतोष हिरे, संदिप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, शरद काटके, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली आहे़ 

Web Title: A medical officer, along with the attendant net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.