एकही मत फुटू न देता प्रदीप कर्पे महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST2021-09-18T04:38:57+5:302021-09-18T04:38:57+5:30

जिल्हाधिकारी दाखलसकाळी ११ वाजेच्या सुमारास महापौर पदासाठी ऑनलाईन विशेष सभा जिल्हाधिकार तथा पिठासीन अधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होणार ...

Mayor Pradip Karpe without giving a single vote | एकही मत फुटू न देता प्रदीप कर्पे महापौर

एकही मत फुटू न देता प्रदीप कर्पे महापौर

जिल्हाधिकारी दाखलसकाळी ११ वाजेच्या सुमारास महापौर पदासाठी ऑनलाईन विशेष सभा जिल्हाधिकार तथा पिठासीन अधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याने सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास शर्मा महापालिकेत दाखल झाले. त्यांनी थेट सभागृहात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

सदस्यांची घेतली हजेरी

महापौर पदासाठी निवड प्रक्रिया असल्यामुळे नगरसेवकांनी ऑनलाईन पध्दतीने सभेत हजर राहणे बंधनकारक असल्याचे नगरसचिव मनोज वाघ यांनी कामकाजाच्या सुरुवातीला स्पष्ट केले. त्यानंतर ऑनलाईन कामकाज सुरु करण्यापुर्वी मनोज वाघ यांनी नगरसेवक, नगरसेविका यांची ऑनलाईन हजेरी घेण्यास सुरुवात केली. तत्पुर्वीच आम्हीही हजर आहोत असे अधून मधून नगरसेवक, नगरसेविका यांच्याकडून सांगण्यात येत असल्यामुळे ते हास्यास्पद ठरले.

अर्ज सादर करण्याची सूचना

महापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून प्रदीप बाळसाहेब कर्पे, काँग्रेसकडून मदिना समशेर पिंजारी, एमआयएमकडून सईदा अन्सारी, शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील आणि अपक्ष आसिफ मोमीन यांनी आपले नामनिर्देशनपत्र पिठासीन अधिकारी शर्मा यांच्याकडे सादर केले.

दोघांनी घेतली माघार

महापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी आणि त्यानंतर माघारीसाठी १५ मिनीटांच कालावधी देण्यात आला होता. त्यात शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील आणि अपक्ष आसिफ मोमीन या दोघांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे माघारी घेत असल्याबद्दलचा अर्ज सादर केला. परिणामी महापौर पदाच्या निवडणुकीत प्रदीप कर्पेंसह मदिना पिंजारी आणि सईद अन्सारी हे तिघे शिल्लक राहिले.

मतदानासाठी ऑनलाईनची सक्तीसभागृहात काही नगरसेवक स्वत:हून आले असलेतरी त्यांना मतदान करताना ऑनलाईन सहभागी होणे बंधनकारक असल्याची सूचना नगरसचिव मनोज वाघ यांनी दिल्यानंतर सभागृहात आलेल्या नगरसेवकांना बाहेर जावे लागले. मतदानात सहभागी होण्यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या दालनाचा आधार घेतला.

मतदानाला सुरुवात

दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत तीन जणांचा सहभाग होता. त्यांना आपल्या मोबाईलचा स्पिकर सुरु करुन सुरुवातीला आपले नाव आणि कोणत्या प्रभागातील आपण सदस्य आहोत हे सांगावे त्यानंतर कोणाला मतदान करणार आहोत याचा स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. नगरसेवक मनोज वाघ यांनी प्रभाग निहाय नगरसेवकांच्या नावांचा पुकाराला केला. प्रत्येक जण आपले नाव सांगून मतदान कोणाला करायचे आहे त्यांचे नाव देखील ऑनलाईन मतदान करण्यापुर्वी सांगत होते आणि त्याची नोंद नगरसचिव वाघ घेत होते.

महापौर पदाची निवड असल्याने सर्व सदस्यांना ऑनलाईन सहभागी होण्याचे बंधन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच नगरसेवक हे ऑनलाईन होते. नगरसेविका हेमा गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे एकूण ७३ जणं ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यात प्रदीप कर्पे यांना ५० मते मिळाली. काँग्रेसच्या मदिना पिंजारी यांना १७ मते मिळाली. तर एमआयएमच्या सईद अन्सारी यांना ४ मते मिळाली. शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्ना पाटील आणि बसपाच्या नगरसेविका सुशीला ईशी या दोन्ही तटस्थ राहिल्या.

Web Title: Mayor Pradip Karpe without giving a single vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.