वेदमंत्रांच्या उच्चारात महापौरांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:08+5:302021-09-21T04:40:08+5:30

धुळे : वेदमंत्रांच्या उच्चारात साेमवारी सायंकाळी नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे यांनी माजी महापौर चंद्रकांत सोनार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, ...

The mayor accepted the post in the recitation of Vedmantra | वेदमंत्रांच्या उच्चारात महापौरांनी स्वीकारला पदभार

वेदमंत्रांच्या उच्चारात महापौरांनी स्वीकारला पदभार

धुळे : वेदमंत्रांच्या उच्चारात साेमवारी सायंकाळी नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे यांनी माजी महापौर चंद्रकांत सोनार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, कुटुंबीय, हितचिंतकांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण केले. मनपाच्या इतिहासात वेदमंत्रांच्या उच्चारात पदग्रहण करणारे प्रदीप कर्पे पहिले महापौर ठरले आहेत.

महापौरपदाच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) नारायण पाटील, नगरसेवक नंदू सोनार, हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, वंदना विश्वकर्मा, कैलास चौधरी, बंटी धात्रक, अनिल थोरात, दगडू बागुल, यशवंत चौधरी, संदीप बैसाणे, बबन चौधरी, यशवंत येवलेकर, रोहित चांदोडे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

आकर्षक फुलांनी सजावट

पदग्रहण सोहळ्याकरिता महापौरांच्या दालनाची विविध आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. वेदमंत्रांचे पठण झाल्यानंतर फेटा घालून महापौर पदाच्या खुर्चीवर बसण्याआधी महापौर प्रदीप कर्पे यांच्या धर्मपत्नी सुनीता कर्पे यांच्यासह कन्या प्रियंका कराड-पाटील तसेच जावई शंतनू कराड-पाटील यांनी औक्षण करून पेढा भरवत अभिनंदन केले.

शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी गर्दी केली. भाजपच्या विविध पदांवर कार्यरत असल्याने विद्यमान महापौर प्रदीप कर्पे यांच्याकडे महापौरपद आले असताना त्यांच्यावर धुळेकरांच्या समस्यांचे ओझेही आहे. समस्यांच्या कचाट्यात सापडलेल्या धुळेकरांना नवनियुक्त महापौर किती आणि काय न्याय देतात? हे वेळ सांगणार आहे.

Web Title: The mayor accepted the post in the recitation of Vedmantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.