शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेर व नगाव येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 13:37 IST

शेतकरी हवालदिल । घरांचे छत उडाले, झाडे उन्मळून पडली, मका, बाजरी, पपईसह अन्य पिके जमीनदोस्त

धुळे : धुळे शहरासह तालुक्यात नेर आणि नगाव येथे शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. तर साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात उंभरे येथे शुक्रवारी सायंकाळी गारपीट झाली आहे. नेर येथे तहसीलदारांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर उंभरे येथे आमदार मंजुळा गावीत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. धुळ्यात ८० तर नेरला ८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.नेर येथे पंचनामे सुरुनेर- नेरसह परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले असून शेतातील उभी पिके आडवी झाली आहे. तर अनेक झाडे उन्मळून पडली असून अनेक घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घरांच्या भिंती, धाबे कोसळल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार तहसीलदार किशोर कदम यांच्यासह नेर मंडळाधिकारी राजेंद्र देवरे, नेरच्या तलाठी राजश्री सुर्यवंशी, बाळापुरचे तलाठी महेंद्र पाटील, गोंदुर तलाठी एस.जी. सुर्यवंशी, भदाणे तलाठी वैशाली बावस्कर, कोतवाल नाना कोळी, सुनिल देवरे, महसुल कर्मचारी, भदाणे येथील कृषी सहाय्यक पवार यांचे पथक शनिवारी दुपारी दाखल झाले. त्यांनी पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.नुकसान भरपाईची मागणीनेर शिवारातील डॉ.सतिष बोढरे, बद्रुद्दिन खाटिक, राजेंद्र जैन, राजाराम हिराजी माळी, दिपक बोढरे, देवेंद्र जैन यांच्यासह अनेक शेतकºयांच्या शेतात पाहणी केली. तसेच ज्या शेतकºयाने विमा काढला असेल त्यांनी कंपनीशी संपर्क साधून नुकासानीची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, डॉ.सतीष बोढरे यांनी तहसीलदारांना विनंती केली की, ज्या शेतकºयांनी विमा काढलेला नाही त्यांचा शासकीयस्तरावर विचार करावा. अगोदरच कोरोनामुळे शेतकºयांची आर्थिक परिस्थिती खुपच खराब झाली आहे. त्यात आता अस्मानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकºयांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.भदाणे शिवारभदाणे शिवारातील रघुनाथ बिजू महानर, भटू बिजू महानर, प्रभाकर भटू माळी, भीमराव झगू श्रीराम, दगडू सखाराम श्रीराम, मधुकर आप्पा श्रीराम, विजय महारू श्रीराम, परमेश्वर मधुकर पाटील, प्रकाश मन्साराम पाटील, दिनेश जयस्वाल, रमेश खंडू जाधव यांच्यासह अन्य शेतकºयांचे मका, बाजरी, कापूस, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नामदेव यशवंत सूर्यवंशी, बेबीबाई हिलाल कोळी व आदिवासी वस्तीवरील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. तर काही पत्रे खाली कोसळले. प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शिवसेनेकडून पाहणीनेर परिसरात शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी पदाधिकाºयांसह शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली. ज्या शेतकºयांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना शासनाची मदत तसेच पिक विम्याचा मोबदला मिळाला पाहिजे. कुणीही शेतकरी वंचित राहता कामा नये. यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. ज्या नुकसानग्रस्त शेतकºयांपर्यंत प्रशासन पोहचले नसेल, अशा शेतकरी बांधवांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा किंवा गावातील शिवसैनिकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी युवा सेनेचे पंकज गोरे, माजी विरोधी पक्षनेते रवींद्र काकड, नेर विभाग प्रमुख रवींद्र वाघ, मंगलसिंह गिरासे, शेतकरी नारायण बोडरे, देवेंद्र त्रिभुवनदास, महेंद्र राजाराम बोढरे, सर्कल आर.बी. देवरे, भटू गवळी, केशव माळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे