पं.स.त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:51 IST2020-03-21T12:50:44+5:302020-03-21T12:51:11+5:30
१५० कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ : नितीन पाटील व विजय पाटील या कर्मचाºयांचा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्क

dhule
शिरपूर : येथील पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना व्हायरसची लागण होवू नये म्हणून दक्षतेच्या आवाहनासोबत मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
शिरपूर येथील पंचायत समितीतील कर्मचारी नितीन निकम-पाटील व विजय पाटील यांनी स्वखर्चाने पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाºयांना गटविकास अधिकारी वाय़डी़शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोफत मास्कचे वाटप केले़
सध्या राज्यात कोरोनाचा कहर झाला असून या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर या आजारापासून आपण दूर राहू शकतो़ हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते़ त्यामुळे आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही़ त्यासाठी योग्य पध्दतीने व साबणाने हात धुतले तरी चालणार आहेत, त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही असे बीडीओ युवराज शिंदे यांनी सांगितले़
नितीन निकम-पाटील व विजय पाटील या पंचायत समितीतील दोघे कर्मचाºयांनी स्वखर्चाने मास्क आणून कार्यालयातील १५० अधिकारी-कर्मचाºयांना त्याचे वाटप केले़ त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले़
उर्वरीत कर्मचारी सकाळी ९़४५ ते दुपारी १़४५ च्या दरम्यान निम्मे कर्मचारी कार्यालयात दिसणार आहेत़ दुपारी २ ते संध्याकाळी ६़१५ वाजेपर्यंत काही कर्मचारी कामावर कार्यरत राहणार आहेत़
जेणेकरून कमीत कमी कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी दूर राहतील असे नियोजन करण्यात आले आहे़
कोरोना विषाणू रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पंचायत समितीस्तरावर अधिकारी व कर्मचाºयांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आहेत़ पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना ओळखपत्रासह आवारात प्रवेश दिला जाणार आहे़ अन्य अधिकारी व कर्मचाºयांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही़