चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:28+5:302021-07-07T04:44:28+5:30
पिंपळनेर येथील सामोडे रोड अनुराधा काॅलनीत राहणारी लीना कपिल जाधव (२६, रा. गुरु गणेश कॉलनी, मोराणे उपनगर, ता. धुळे) ...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ
पिंपळनेर येथील सामोडे रोड अनुराधा काॅलनीत राहणारी लीना कपिल जाधव (२६, रा. गुरु गणेश कॉलनी, मोराणे उपनगर, ता. धुळे) या विवाहितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. २० एप्रिल २०१७ मध्ये मोराणे गावात पिंपळनेर येथील कपिल शांताराम जाधव यांच्याशी विवाह झाला. माझ्या वडिलांनी लग्नात सोन्याचे दागिने मला आणि माझ्या पतीला दिले. गावात आमचे एकत्र कुटुंब आहे. लग्नात देण्यात आलेले दागिने माझ्याकडून सासरच्या लोकांनी ताब्यात घेतले होते. सुरुवातीचे सात ते आठ महिने त्यांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पिंपळनेर गावात मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावण्यात आला. एवढ्यावरच न थांबता माझ्या नावावर १५ लाखाचे कर्ज काढण्याचे सांगितल्यावर त्यास लीना जाधव यांनी नकार दिला. त्यानंतर सतत मला बोलत राहणे, शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. चारित्र्याचा संशय घेऊन मला मारहाणदेखील करण्यात आली. सततच्या जाचाला कंटाळून लीना जाधव या माहेरी मोराणे गावी निघून आल्या. त्यानंतर १ जुलै रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कपिल शांताराम जाधव, मंगला शांताराम जाधव, शांताराम जाधव, डॉ. महेश शांताराम जाधव, डॉ. मनिषा महेश जाधव, सत्यजित शांताराम जाधव (सर्व रा. पिंपळनेर) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गावित करीत आहेत.