चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST2021-02-11T04:37:46+5:302021-02-11T04:37:46+5:30
शहरातील नकुल सोसायटीत माहेर असलेल्या विवाहितेला चोपडा येथील पती चारित्र्याच्या संशयावरून सातत्याने त्रास देत होता. या प्रकरणी महिलेने शिरपूर ...

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ
शहरातील नकुल सोसायटीत माहेर असलेल्या विवाहितेला चोपडा येथील पती चारित्र्याच्या संशयावरून सातत्याने त्रास देत होता. या प्रकरणी महिलेने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिरपूर शहरातील नकुल सोसायटी येथे माहेर असलेल्या विवाहितेचा विवाह २००९ मध्ये चोपडा येथील योगेश प्रकाश सूर्यवंशी यांच्याशी झालेला होता. लग्नानंतर एक वर्ष सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती योगेश सूर्यवंशी हे पत्नीशी चरित्राच्या संशय घेऊन वाद घालू लागले. विवाहितेच्या अंगावरील दागिनेही काढून घेतले. पतीने जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली. अखेर विवाहितेने शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पती योगेश प्रकाश सूर्यवंशी (रा. महालक्ष्मीनगर, चोपडा, जिल्हा जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.