मार्गदर्शनाअभावी अनेकजण अयशस्वी होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:38+5:302021-07-09T04:23:38+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र व विद्या विकास मंडळाचे सी. गो. पाटील ...

मार्गदर्शनाअभावी अनेकजण अयशस्वी होतात
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र व विद्या विकास मंडळाचे सी. गो. पाटील महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचार्य आणि करिअर कट्टा समन्वयक ऑनलाइन सहविचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते.
यशवंत शितोळे पुढे म्हणाले, महाविद्यालयीन युवक ज्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्याचे उद्योजकीय कौशल्य वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनांची ओळख युवकांना व विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी ज्ञानाची वृद्धी व्हावी यासाठी आय. ए. एस. आपल्या भेटीला हा उपक्रमदेखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. शारदा शितोळे, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे, प्राचार्य डॉ. पी. एच. पाटील यांनी उपक्रमाविषयी नावीन्यपूर्ण सूचना देत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. आभार डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मानले. ऑनलाईन पार पडलेल्या या सभेस विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य तथा करिअर कट्ट्याचे समन्वयक बहुसंख्येने उपस्थित होते.