पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३७ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:18+5:302021-02-05T08:45:18+5:30
जिल्हा पशु वैद्यकीय विभागातील जिल्ह्यात श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ४६ एवढी आहे. या ठिकाणी पशुधन विकास ...

पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३७ पदे रिक्त
जिल्हा पशु वैद्यकीय विभागातील जिल्ह्यात श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ४६ एवढी आहे. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी वर्ग २ दर्जाच्या अधिकाऱ्यांची ४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १३ पदे कार्यरत असून, तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. त्यात धुळे तालुक्यात १, साक्री तालुक्यात १५, शिंदखेडा तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ८ पदे रिक्त आहेत. तर श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ७१ आहे. या ठिकाणी ७१ पशुधन पर्यवेक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तर तब्बल ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये धुळे तालुक्यात १६, साक्री तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ७ पदे अनेक वर्षांपासुन रिक्त असल्याने अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पशुपालकांची मोठ्या प्रमाणात गैरसाेय सहन करण्याची वेळे येते.