आजार टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:47 IST2019-08-25T13:43:30+5:302019-08-25T13:47:25+5:30
चंद्रकांत सोनार । धुळे : मान्सुन सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्यविषयी तक्रारी सुरू होतात़ त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रत्येकाने ...

dhule
ठळक मुद्देरूग्णांनी शारिरीक व मानसिक तणाव टाळावापुरेशी विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावेआरोग्यदायी आहार घ्यावा,
च द्रकांत सोनार । धुळे : मान्सुन सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्यविषयी तक्रारी सुरू होतात़ त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहीजे़ पावसाळ्यात दुषीत पाण्याने आजाराची लागण होते़ त्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार यांनी लोकमत शी बोलतांना दिली़ प्रश्न : डेंग्यू आजाराची लक्षणे व कशी काळजी घ्यावी ?उत्तर : एडिस इजिप्टाय प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गीत मादिच्या चावण्यामुळे ह्या आजाराची लागण होत असते़ २०११ पासून जिल्ह्यात ७९६ डेंग्यूचे रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़ डेंग्यू आजाराच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, डोके दुखी, उलटी, अंगदुखी, डोळयाच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात़प्रश्न : डासांचा प्रार्र्दुभाव टाळण्यासाठी काय करावे ?उत्तर : डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, दारे खिडक्यांना जाळी बसविल्यास, डासांना अटकाव करू शकतो, घराच्या परिसरात कुठेही पाणी साचून डबके होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच डास प्रतिबंधक अगरबत्तीचा वापर केल्यास डांसाच्या प्रार्दुुभाव रोखता येवू शकतो़प्रश्न : साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी मनपाकडून भुमिका काय?उत्तर : महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन घरे, लोकसंख्या सर्वेक्षण करण्यात येत असून, खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा, दवाखाने येथील रुग्ण शोधमोहीमही राबविली जात आहे. या सर्वेक्षणात कीटकजन्य आजार व साथीच्या रोगांचे रुग्ण आढळलेल्या परिसरात संबंधित नागरी आरोग्य केंद्रामार्फत तातडीने उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे आढळून येणाºया तापाच्या रुग्णांना गृहितोपचार देणे, कंटेनर सर्वेक्षण, दूषित कंटेनर रिकामे करणे, बांधकाम सर्वेक्षण, रक्तनमुने गोळा करणे, हस्तपत्रके वाटून जनजागृती केली जात आहे़रूग्णांनी खबरदारी घेण्याची गरजताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला आलेल्या व्यक्तीने अन्य व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, शिंकतांना किंवा खोकतांना तोंडावर रूमाल धरावा, डॉक्टरांनी दिलेल्या औषधाशिवाय गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात, गरम पाण्याची वाफ घ्यावी, वारंवार हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत, घरातील टेबल, टिपॉय, संगणकाचा पृष्ठभाग सतत स्वच्छ करावा,सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवावी रूग्णांनी शारिरीक व मानसिक तणाव टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, आरोग्यदायी आहार घ्यावा, धुम्रपान करणे टाळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये़ स्वच्छता पाळावी असे उपाय केल्यास आजारावर नियंत्रण मिळविता येते़