शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

धुळे येथे विश्वशांतीसाठी महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 6:35 PM

रविवारी स्वामीनारायण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

ठळक मुद्दे२४०० दाम्पत्यांनी बसले यज्ञाला चार तास सुरू होता सोहळारविवारी स्वामी नारायण महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा

आॅनलाइन लोकमतधुळे : भारतासह जगात प्रेम, बंधुता, सामाजिक सहकार, मुल्यनिष्ठा, उपासना आणि सर्वत्र शांतता निर्माण व्हावी, आतंकवाद नाहीसा व्हावा यासाठी आज सकाळी महायज्ञ करण्यात आला. यासाठी तब्बल २४०० जोडप्यांनी पूजा केली. दरम्यान रविवारी स्वामी नारायण मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. देवपूरात असलेल्या स्वामिनारायण मंदिराच्या परिसरात गुलाबी दगडापासून नवीन भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. या मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त ८ फेब्रुवारीपासून सोहळ्यास सुरूवात झालेली आहे.शुक्रवारी ४८ चित्ररथांनी सजविलेल्या चित्ररथांनी भगवान स्वामिनारायणांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. शनिवारी विश्वशांतीसाठी महायज्ञ करण्यात आला. यासाठी ३०० यज्ञकुंडी तयार करण्यात आली होती. एका यज्ञकुंडाच्या ठिकाणी आठ दाम्पत्य बसले होते. असे एकूण २४०० दाम्पत्यांनी यज्ञात सहभाग घेतला होता.सुरवातीला महंत स्वामी महाराज यांचे एका वाहनातून यज्ञस्थळी आगमन झाले. मुख्य यज्ञकुंडात महंत स्वामी महाराजांनी आहुती टाकल्यानंतर यज्ञ सोहळ्यास सुरूवात झाली. वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात यज्ञात आहुती टाकण्यात येत होती. तसेच भाविक भक्तांच्या जीवनात आणि विश्वातील समस्त मानवाला शांती मिळावी, ते सुखी रहावे अशी प्रार्थना करण्यात आली.सुमारे चार तास हा यज्ञ सोहळा सुरू होता. यावेळी महंत स्वामी महाराज यांनी आशिर्वाद देतांना म्हणाले, यज्ञ परंपरा भारताची प्राचीन, वैदीक परंपरा आहे.सर्व भौतिक आणि जैविक तत्वांच्या सहकाराची भावना यज्ञात अभिव्यक्त होत असते. भगवान स्वामीनारायणांची भावना सर्व जीवहितासाठी होती. यज्ञसोहळा सुरू असतांना शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. यावेळी साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी मुख्य सोहळा होणारमंदिरात रविवारी सकाळी १० वाजेपासून वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात स्वामी नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरूवात होणार आहे. हा सोहळा सुमारे दोन तास सुरू राहिल. महंत स्वामी महाराज यांच्याहस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होइल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान मंदिरात स्थापित करण्यात येत असलेली भगवान स्वामीनाायणांची मूर्ती पाच फुटाची असून, ती जयपूर येथून आणण्यात आलेली आहे. या ंमंदिरातमध्ये अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी, हरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, घनश्याम महाराज, शिवपार्वती-गणेश, राम,सीता, हनुमान, विठ्ठल-रूख्मिणी आदी मूर्तींची  स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे