बळसाणे उपसरपंचपदी महावीर जैन यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:36+5:302021-02-05T08:46:36+5:30
उपसरपंच जन्याबाई मासुळे यांचा वर्षाचा कालखंड संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. उपसरपंच निवडकरता येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ...

बळसाणे उपसरपंचपदी महावीर जैन यांची निवड
उपसरपंच जन्याबाई मासुळे यांचा वर्षाचा कालखंड संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. उपसरपंच निवडकरता येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. रिक्त झालेल्या जागेसाठी शिवसेनेचे महावीर जैन यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक ए. टी. कुवर यांनी जाहीर केले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य ध्यानाबाई माळचे , जन्याबाई मासुळे , रमणबाई चव्हाण , कल्पना ईशी , मलिखा पठाण , महावीर जैन , देविदास धनुरे , अवचित धनगर , महादू पाटील , इंद्रसिंग गिरासे , प्रा.भूषण हालोरे , शायसिंग मोरे उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच महावीर जैन यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. दरम्यान जैन समाजाच्या सदस्याची उपसरपंचपदी निवड झाल्याने समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.