एम. एस्सी.चे वर्ग सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST2021-02-26T04:49:45+5:302021-02-26T04:49:45+5:30
जि. प.ची १ रोजी सर्वसाधारण सभा धुळे : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक १ मार्च ...

एम. एस्सी.चे वर्ग सुरू करण्याची मागणी
जि. प.ची १ रोजी सर्वसाधारण सभा
धुळे : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक १ मार्च रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे असतील. आता ही सभा ॲानलाईन होणार की ॲाफलाईन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सभेच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
वीजबिल भरण्याची ग्राहकांना चिंता
धुळे : महावितरण कंपनीने थकीत वीजबिलांची वसुली सुरू केल्याने, थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. पाच-सहा महिन्यांचे बिल एकदम कसे भरावे, याची अनेकांना चिंता लागली असून, वीजबिलात सवलत देण्याची मागणी होऊ लागली आहे.
खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
धुळे : खरिपाचा हंगाम अद्याप लांब असला तरी जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली पाहिजेत, याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पारंपरिक ऐवजी कमी खर्चात जास्त उत्पादन येऊ शकेल, अशा पिकांविषयी सल्ला देणे गरजेचे आहे.
रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडाव्यात
धुळे : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते संतोषी माता मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला काटेरी झुडपांच्या फांद्या वाढलेल्या असून, त्या वाहनधारकांना लागत असतात. या फांद्या तोडण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भाज्यांची आवक घटली, दर वधारले
धुळे : उन्हाळ्याची चाहुल लागताच गेल्या काही दिवसांपासून येथील भाजी मार्केटमध्ये होणारी पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. अनेकांनी आतापासूनच डाळी खरेदीला प्राधान्य दिले आहे.
पॅसेंजर सुरू होत असल्याने समाधान
नरडाणा : रेल्वे विभागाने येत्या १ मार्चपासून सुरत-भुसावळ मार्गावर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण पॅसेंजर गाडीच नसल्याने, प्रवाशांना प्रवासासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.
ग्रामीण भागात अजूनही उदासिनता
पिंपळनेर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी ग्रामीण भागात नियम पाळण्याबाबत उदासिनता दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातही लक्ष देण्याची गरज आहे.