धुळ्यानजिक अवधान टोलनाक्यावर लक्झरीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:54 IST2018-09-20T22:53:28+5:302018-09-20T22:54:48+5:30

दोघांचा दारु पिऊन धिंगाणा : टोलनाक्यावरील कर्मचाºयांमुळे मोठा अनर्थ टळला

Luxury smuggling on tollanak | धुळ्यानजिक अवधान टोलनाक्यावर लक्झरीची तोडफोड

धुळ्यानजिक अवधान टोलनाक्यावर लक्झरीची तोडफोड

ठळक मुद्देअवधान टोलनाक्यावरील सायंकाळी घडला प्रकारटोलनाक्यावरील कर्मचाºयांना पकडून दिले दोघांनापोलिसात तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : उत्तरप्रदेशकडून मुंबईकडे जाणाºया लक्झरीला अवधान टोलनाका भागात अडविण्यात आले़ तिची तोडफोड करत दोघा दारुड्यांनी अक्षरश: धिगांणा घातला़ टोलनाक्याच्या कर्मचाºयांनी या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले़ दरम्यान, एका पोलीस कर्मचाºयाला त्यांच्याकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला़ 
एमएच ०४ एफके १७९४ क्रमांकाची लक्झरी ही उत्तरप्रदेश राज्यातून मुंबईकडे मजुरांना घेऊन जात होती़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान टोलनाक्याजवळ हे वाहन आल्यानंतर अचानक दोघांनी या लक्झरी चालक उदबुद्दीन समीर उल्ला (रा़ कुर्ला, मुंबई) याच्याशी वाद घातला़ त्यानंतर शिवीगाळ करत लक्झरीची काच फोडली़ एवढ्यावरच न थांबता लक्झरीमधील मजुरांकडून लूट देखील केली़ यानंतर टोलनाक्याच्या कर्मचाºयांनी त्यांना पकडले़ मात्र, घटनेबाबत समझोता झाल्याने पोलिसात तक्रार नव्हती़ 
दरम्यान, लक्झरीची तोडफोड झाल्याची घटना खरी आहे़ तोडफोड करणाºया दोघांबद्दल तक्रार न आल्यामुळे कारवाई केलेली नाही, अशी माहिती मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ 

Web Title: Luxury smuggling on tollanak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.