भरधाव बस ट्रकवर आदळली सुदैवाने जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 22:46 IST2019-11-10T22:46:33+5:302019-11-10T22:46:55+5:30
गरताडबारीनजिक अपघात : १४ प्रवासी जखमींवर उपचार, तत्काळ आर्थिक मदत

भरधाव बस ट्रकवर आदळली सुदैवाने जीवितहानी टळली
धुळे : परभणीच्या दिशेने जाणारी महामंडळाची एसटी बस पुढील ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली़
एमएच २० बीएल ३९१७ क्रमांकाची व अमळनेर येथून परभणीकडे जाणारी बस धुळे बसस्थानकातून सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुढे मार्गस्थ झाली़ चाळीसगाव मार्गावर गरताड बारीजवळ असताना बसच्या पुढे जाणाºया ट्रकने अचानक ब्रेक दाबला़ परिणामी भरधाव जाणाºया बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले़ त्यामुळे बस जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूस जोरात आदळली. सकाळची वेळ असल्यामुळे काही प्रवासी झोपेत होते़ अचानक अपघात झाल्यामुळे १४ प्रवाशांना दुखापत झाली़
जखमींमध्ये, एकनाथ सिताराम वाणी, यमुनाबाई रविंद्र पवार (५५), सुनील तुळशीराम माळी (४०), नंदा सुनील वाणी (३०), नवल सोनू चौधरी (७८), नयन रमेश पाटील (१३), सार्थ रमेश पाटील (१०), शंकुतला वसंत पाटील (५५), योगिता रमेश पाटील (३१), आदित्य रविंद्र ठाकूर (०९), आशाबाई अधिकार चौधरी (३५), प्रमिला प्रेमराज महाजन (५६), अनिता अनिल वाडीले (३५), सुमीत अमोल वाडीले (१५) यांचा समावेश आहे़ अपघाताच्या घटनेनंतर त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ या अपघातात गंभीर जखमी कोणीही झालेला नाही़
अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या धुळे विभागीय वाहतूक अधिकारी किशोर महाजन, धुळे आगारप्रमुख भगवान जगनोर, वाहतूक निरीक्षक घनश्याम बागुल, धुळे विभागाचे कार्यशाळा अधीक्षक हर्षल गोसावी या अधिकाºयांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ जखमींना रुग्णालयात पाठविल्यानंतर त्यांना तातडीची ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़