दहीवद येथे पॅनलप्रमुखांसह सौभाग्यवती रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:31+5:302021-01-10T04:27:31+5:30
शिरपूर : तालुक्यात २८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली असून, त्यात प्रतिष्ठेची लढत दहीवद, होळ व मांडळ येथे पहायला मिळणार आहे. ...

दहीवद येथे पॅनलप्रमुखांसह सौभाग्यवती रिंगणात
शिरपूर : तालुक्यात २८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली असून, त्यात प्रतिष्ठेची लढत दहीवद, होळ व मांडळ येथे पहायला मिळणार आहे. दहीवद येथे पॅनलप्रमुखांसह त्यांच्या सौभाग्यवतीदेखील रिंगणात उतरल्या आहेत
दहिवद येथे १७ जागांसाठी निवडणूक लागली असून, सत्ताधारी गटाचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मधुकर चव्हाण-पाटील उर्फ बाळूदादा हे गावातीलच एका शैक्षणिक संस्थेत कर्मचारी आहेत. त्याच संस्थेतील अध्यक्ष लक्ष्मीकांत बापूराव चव्हाण-पाटील यांच्या विरोधात त्यांनी सन २०१५च्या निवडणुकीत रंगशिंग फुंकले होते. त्यावेळी चंद्रकांत चव्हाण यांच्या गटाने १७ पैकी १४, तर विरोधकांना फक्त तीनच जागा पटकाविता आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत ते दोघे रिंगणात उतरून आमने-सामने पॅनल उभे केले आहे़
सरपंचपदावर डोळा ठेवून दोघे पॅनेल प्रमुखांसह त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग १ ‘अ’मध्ये स्मिता लक्ष्मीकांत पाटील, सुनंदा चंद्रकांत चव्हाण, ‘ब’मध्ये हिंमतराव श्यामराव पाटील, श्रीराम भिला बागुल, मयूर देवेंद्र पाटील, प्रभाग २ ‘अ’मध्ये धाकलू कृष्णा गवळी, भिका देवका गवळी, ईश्वर भटू गवळी, ‘ब’मध्ये सरस्वती नथू पारधी, बायली गोपाल पावरा, ‘क’मध्ये ताराबाई सुरेश कोळी, सुनीता सुनील गांगुर्डे, प्रभाग ३ ‘अ’मध्ये गोपाल शिलदार पावरा, चंद्रसिंग जोतीराम मोरे, ‘ब’मध्ये अरुणाबाई नाना पावरा, गडवतीबाई दुर्गादास पावरा, ‘क’मध्ये लक्ष्मीकांत बापूराव पाटील, चंद्रकांत मधुकर चव्हाण, प्रभाग ४ ‘अ’मध्ये गणेश धना सोनवणे, कल्पनाबाई अजय भील, ‘ब’मध्ये मीराबाई चैत्राम मोरे, वत्सलाबाई रावसाहेब मालचे, ‘क’ मध्ये वृषाली चुनिलाल पाटील, आशा रवींद्र पाटील, प्रभाग ५ ‘अ’मध्ये राजेंद्र झेंडू रणदिवे बिनविरोध, ‘ब’मध्ये संभाजी रामदास पाटील बिनविरोध, ‘क’मध्ये विठाबाई यादव चौधरी, जिजाबाई विठोबा मराठे, शालूबाई सुधाकर पाटील, प्रभाग ६ ‘अ’मध्ये प्रतिभाबाई देवीदास पाटील, मालूबाई वसंत पाटील, मीनाबाई कैलास दोरीक, ‘ब’मध्ये निर्मलाबाई नारायणसिंग राजपूत, रत्नकोर भिकन राजपूत, ‘क’मध्ये दीपक वसंतराव चव्हाण, किशोर विश्वास पाटील, असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माघारीअंति १७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १५ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिनविरोध झालेले रणदिवे हे अपक्ष असून, संभाजी पाटील हे लक्ष्मीकांत पाटील गटाचे असल्याचे सांगण्यात येते. विशेषत: दोघे पॅनलप्रमुखासह त्यांच्या सौभाग्यवतीदेखील रिंगणात उतरल्यामुळे एकाच घरातील डबल उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने लढत आहेत. सुतकी भाऊबंदकी असताना केवळ वर्चस्वाकरिता पॅनल रिंगणात उतरले आहे. विशेषत: निवडून आला तरी चव्हाणाचेच पॅनल असणार आहे, पडला तरी चव्हाणचेच पॅनल राहणार आहे.
होळ ग्रामपंचायत
होळ येथे ११ जागांसाठी निवडणूक होत असून, २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जि.प. सदस्य प्रा. संजय पाटील व व्यापारी कुटुंबातील तरुण तणवीर शिंपी यांनी समोरासमोर पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे करून चुरस निर्माण केली आहे. मात्र गावाजवळील अजंदे गावाचे सरपंच चंद्रकांत पाटीलसह अन्य गावपुढाऱ्यांनी शिंपी यांच्या पॅनलला समर्थन दिल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
प्रभाग १ ‘अ’मध्ये मोहन चिंधा भील, शिवदास नसर सोनवणे, ‘ब’मध्ये देवनाथ माणका भोई, सुरेश शामराव भोई, ‘क’मध्ये अरुणा अनिल कुंभार, खटाबाई वासुदेव गुजर, प्रभाग २ ‘अ’मध्ये गीताबाई पदमसिंग चव्हाण, रत्नाबाई सुरेश शिंपी, ‘ब’मध्ये द्वारकाबाई ताराचंद जाधव, लताबाई गिरधार जाधव, ‘क’मध्ये मितेश सुरेशचंद्र जैन, जितेंद्र टागोरसिंग परदेशी, प्रभाग ३ ‘अ’मध्ये साखुबाई सजन बैसाणे, ज्योती रवींद्र सपकाळे, ‘ब’मध्ये कृष्णाथ शंकर भोई, सखुबाई जवाहरलाल भोई, प्रभाग ४ ‘अ’मध्ये सुभाबाई मंगा भील, विमल भगवान भील, ‘ब’मध्ये भटाबाई श्रीराम कोळी, सुरेखा नगीनदास कोळी, सगुणा तुकाराम कोळी, ‘क’मध्ये राजेंद्रसिंग पंढरीनाथ जाधव, उदेसिंग दादूसिंग राजपूत हे उमेदवार आमने-सामने रिंगणात उतरले आहेत.
मांडळ ग्रामपंचायत
मांडळ येथे सात जागासाठी सरळ लढत होत असून, १४ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी गटाचे विद्यमान सरपंच सुनील भटू सोनवणे यांच्या विरोधात माजी उपसरपंच योगेंद्र हिलाल सोनवणे यांनी पॅनल रिंगणात उतरून ते सुध्दा आमने-सामने उतरले आहेत.
प्रभाग १ ‘अ’मध्ये स्वाती जितेंद्र बागुल, ज्योती जितेंद्र माळी, ‘ब’मध्ये जयश्री गोपाल माळी, मोहिणी दिनेश माळी, ‘क’मध्ये योगेंद्र हिलाल सोनवणे, सुनील भटू सोनवणे, प्रभाग २ ‘अ’मध्ये गिरीश सदाशिव सोनवणे, सुनीता श्रावण सोनवणे, ‘ब’मध्ये अश्विनी उमाकांत सोनवणे, सीमा विशाल सोनवणे, प्रभाग ३ ‘अ’मध्ये शत्रुघ्न रामसिंग मोरे, नीलेश सोमा सोनवणे, ‘ब’मध्ये अक्काबाई दिलीप भील, सुनीता किशोर सोनवणे हे समोरासमोर रिंगणात आहेत.
केवळ एका जागेसाठी निवडणूक
बाळदे, भटाणे, बोरगाव, भोरखेडा व बाभुळदे असे पाच ग्रामपंचायतींमध्ये केवळ एका जागेसाठी निवडणूक लागली असून, उर्वरित सर्वच्या सर्व जागा माघारी अंति बिनविरोध झाल्यात.
बलकुवे, कुवे, चाकडू, होळ, उप्परपिंड, दहीवद, नटवाडे, जामन्यापाडा, गरताड, भाटपुरा, साकवद, जुने भामपूर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, शेमल्या याठिकाणी आमने-सामने लढती असणार आहेत.