दोंडाईचानजिक रेल्वेखाली येवून प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:19 IST2018-10-20T12:18:42+5:302018-10-20T12:19:59+5:30
परिसरात हळहळ : सकाळी उघडकीस आली घटना

दोंडाईचानजिक रेल्वेखाली येवून प्रेमीयुगुलाची आत्महत्या
ठळक मुद्देदोंडाईचानजिक प्रेमीयुगुलाची आत्महत्याआत्महत्येमुळे परिसरात व्यक्त होतेय हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा ते नंदुरबार रेल्वे मार्गावरील दोंडाईचानजिक रेल्वेखाली झोकून देत एका प्रेमीयुगुलाने आपले जीवन संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ हा प्रकार शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे़ त्यादृष्टीने तपासाला सुरुवात झाली आहे़ सकाळी या भागात दोघांचा मृतदेह आढळल्यानंतर आत्महत्या केल्याचे समोर आले़ हे प्रेमीयुगुल कोण? ते राहणारे कुठले? त्यांनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल का उचलले असावे? या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेची नोंद अद्याप पोलिसात झालेली नाही़