गावे बदलताना पाहून  आनंद व समाधान, धुळ्यात अमीर खानचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:01 PM2018-05-14T23:01:03+5:302018-05-14T23:01:03+5:30

पत्रकार परिषद : लामकानी गावात केले श्रमदान

Looking at changing villages, I am happy and satisfied, Amir Khan's rendition in Dhule | गावे बदलताना पाहून  आनंद व समाधान, धुळ्यात अमीर खानचे प्रतिपादन

गावे बदलताना पाहून  आनंद व समाधान, धुळ्यात अमीर खानचे प्रतिपादन

Next
ठळक मुद्देसिने अभिनेते अमीर खान यांनी केले लामकानीत श्रमदानधुळ्यात साधला पत्रकार परिषदेतून संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वॉटरकप स्पर्धेमुळे गावांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी गावांमध्ये पाणलोटांचे मोठे काम उभे राहत असून त्यामुळे या गावांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे. गावोगावी या स्पर्धेतील लोकांचा मोठा सहभाग व त्यामुळे होणारे काम पाहून गावे बदलत असल्याची खात्री पटते. त्यामुळे आनंद व समाधानही मिळते, असे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान याने येथील पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच्यासोबत त्याची पत्नी किरण राव याही होत्या. दरम्यान, धुळे तालुक्यातील लामकानी गावात सिने अभिनेते अमीर खान यांनी श्रमदान केले़
ही अशी स्पर्धा आहे की ज्यात कोणीही हरत नाही. बक्षिस नाही मिळाले तरी त्या गावाने केलेल्या कामामुळे तेथील पाणी समस्या मिटलेली असते. गावांच्या समस्यांचे उत्तर गावांमध्येच आहे. ग्रामस्थांनी ठरविले तर काहीही कठीण नाही, याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहे. बदल ही निरंतर प्रक्रिया असून गावांमध्ये हा बदल दिसत आहे. घरातील एखादी आपण स्वत: तयार केलेली वस्तू नादुरूस्त होते, तेव्हा नेमके काय झाले आहे, हे आपणास बरोबर समजते. त्याप्रमाणे गावांचे पाणलोटांचे आहे. लोक स्वत: हे काम करत असल्याने त्यातील काय योग्य, काय चूक हे त्यांना बरोबर समजेल, असेही त्याने स्पष्ट केले. 
स्पर्धेत सहभागी गावांनी जल साठवण क्षमता वाढवली आहेच; पण या मुळे गावांमध्ये जे ‘मनसंधारण’ झाले आहे ते अमूल्य आहे. सर्व जाती-धर्म व राजकीय विचारांचे लोक गावाकरीता एकत्र येऊन काम करत आहेत, ही मोठी गोष्ट असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.  

Web Title: Looking at changing villages, I am happy and satisfied, Amir Khan's rendition in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे