लोकसभा निवडणूक प्रचाराच्या   तोफा आज संध्याकाळी थंडावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:33 IST2019-04-27T11:26:05+5:302019-04-27T11:33:59+5:30

प्रशासनातर्फे तयारी पूर्ण : कर्मचाºयांना होणार उद्या मतदान साहित्याचे वितरण 

The Lok Sabha election campaign will be stopped this evening | लोकसभा निवडणूक प्रचाराच्या   तोफा आज संध्याकाळी थंडावणार 

dhule

ठळक मुद्देdhule


धुळे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शनिवारी २७ एप्रिल शेवटचा दिवस असुन गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी ७ वाजता थंडावणार आहे़ 
मतदानासाठी केवळ  ४८ तास शिल्लक असून २९ रोजी मतदार राजा नवीन खासदाराची निवड करणार आहे़ मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा प्रशासकीय तयारीला वेग आला आहे़ १७ व्या लोकसभेसाठी १० मार्च रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी झाली आहे़ युती, आघाडी होण्यासह उमेदवारी घोषित करण्यासाठी या काळात पक्षांना मोठी कसरत करावी लागली होती़  
यावर्षी अधिसुचना जारी होण्यापुर्वी काही दिवस शिल्लक असतांना देखील अनेक पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नव्हती़ धुळे लोकसभा मतदार संघातुन २८  उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ 
 प्रचाराला बंदी
लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर सोशल मीडियावरील प्रचार करता येणार नाही़ या व्यतिरिक्त वृत्तपत्रात जाहीरात द्यायची असल्यास ती माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रामाणिक करून घ्यावी लागणार आहे़ 
एक लाख नव मतदार 
यंदा लोकसभा निवडणुकीत अठरा वर्षापुढील नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आह़े़ तर २१ तृतीय पंथीय मतदार आहेत़ असे एकूण १९ लाख ४ हजार ५९ मतदार संख्या आहे. यात महिला मतदार संख्या ९ लाख १० हजार ९३५ तर पुरुष मतदार संख्या ९ लाख ९३ हजार ९०३ इतकी आहे.  मतदान केंद्राची संख्या १ हजार ९४० आहे. यामध्ये ७३ मतदार केंद्र संवेदनशील असल्याने प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येणार आहे़ 
२८ उमेदवार रिंगणात
लोकसभा मतदार संघात एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे़ मात्र खरी लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसेच भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे लोकसंग्राम पक्षातर्फे अपक्ष उमेदवारी करत आहे़ त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे़ 
 टक्का वाढण्याचा अंदाज 
२०१४ मध्ये धुळे लोकसभेसाठी ५३. ९८ टक्के मतदान झाले होते़ यदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती अभियाना व्दारे मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे़ त्यामुळे यंदा टक्का वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे़ 
८२२ वाहनांची व्यवस्था
२९ एप्रिल रोजी होणाºया मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पुर्णत्वास आली आहे़ त्यासाठी मतदान साहित्य पोचविण्याची जबाबदारी कर्मचारी सोपविण्यात आली आहे़ त्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी ८८२ वाहनांची मदत घेण्यात येणार आहे़ यात २८२ एसटी बसेस व ६०० खाजगी वाहनांचा यात समावेश आहे. १८८ ठिकाणी वेब कास्टिंग राहणार आहे.
चोख पोलिस बंदोबस्त 
धुळे लोकसभा मतदार संघासाठी २९ रोजी होणाºया निवडणुकीसाठी चोख पोलिस बंदोस्त तैनाद करण्यात आला आहे़  पोलिस कर्मचारी, आरसीपी, एसआरपी, होमगार्डसह अन्य पोलिस अधिकाºयांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत़ 

भाजप-काँग्रेस नेत्यांच्या झाल्यात सभा
सुरेश प्रभू
देवेंद्र फडणवीस
सुधीर मुनगंटीवार
अ‍ॅड.प्र्रकाश आंबेडकर
पृथ्वीराज चव्हाण
अशोक चव्हाण
हर्षवर्धन पाटील
बाला बच्चन 

विश्वास कदम

तीन तासात काढावे लागणार प्रचार साहित्य
४२७ रोजी प्रचार संपल्यानंतर तीन तासात म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यत सर्वच राजकीय पक्षांना आपापले प्रचार साहित्य काढून घ्यावे लागणार आहे़
४२९ रोजी २८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे़त्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत मतदान करता येणार आहे़ 

Web Title: The Lok Sabha election campaign will be stopped this evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे