कुलूप लावलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:22+5:302021-02-24T04:37:22+5:30
जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार साेमवारी ७५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत, तर मंगळवारी सायंकाळी बाधितांच्या संख्येत आणखी ...

कुलूप लावलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार
जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार साेमवारी ७५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत, तर मंगळवारी सायंकाळी बाधितांच्या संख्येत आणखी वाढ झालेली आढळून आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १५ हजारांवर गेली आहे. कोरोना बाधितांची तपासणी तातडीने होण्यासाठी मनपासह शिरपूर, दाेंडाईचा, साक्री, शिंगावे येथील कोविड सेंटर सुरू केली जाणार आहेत.
फक्त हिरे महाविद्यालयामधील कोविड सेंटरमध्ये होतेय् तपासणी -
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शहरातील भाऊसाहेेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोग शाळा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. सध्या केवळ हिरे रुग्णालयात काेरोना बाधितांची नियमित तपासणी व उपचार केले जात आहेत. बाधितांची संख्या वाढू लागल्याने आता पुन्हा इतर सेंटर सुरू केली जाणार आहेत.
कोट - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी नियमित मास्क तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मध्यंतरी कोरोना बाधितांच्या तपासणीचे प्रमाण कमी झाले होते. आता जिल्ह्यातील काही कोविड सेंटर नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे