म्हसदी : येथील कुलदैवत धनदाई देवीला नवस पूर्तीनिमित्त भाविकांनी अर्पण केलेले बोकड सरपंच दीपक जैन यांनी महावीर जयंतीचे औचित्य साधून खरेदी करून त्यांना जीवदान दिले. येथील धनदाई देवीला काही भाविक नवस पूर्तीनिमित्त जिवंत बोकड अर्पण करतात. अशाप्रकारे चैत्र शुद्ध अष्टमीला भाविकांनी १३ बोकड देवीला अर्पण केले. ‘जिओ और, जीने दो’ हा भगवान महावीरांचा संदेश अंमलात आणत सरपंच दीपक जैन यांनी बोकड खरेदी केले व ते ११०० कि.मी. अंतरावरील राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात स्वतंत्र वाहनाने पाठविण्यात येणार आहे. सागर टाटीया यांनी या संकल्पनेला बळ दिल्याने या बोकडांना अभयदान देऊ शकलो, याचे समाधान असल्याचे सरपंच दीपक जैन यांनी सांगितले. यावेळी तरुण ऐक्य मंडळ अध्यक्ष हिंमतराव देवरे, सागर टाटिया, प्राचार्य सतीश देवरे, प्रा.उज्ज्वला देवरे, पुरोहित सुरेश जोशी, समाधान देवरे, राहुल सोनवणे, शरद सोनवणे, धोंडू खैरनार व धनदाई देवी मंदिर ट्रस्टचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवसपूर्तीसाठी भक्तांनी दिलेल्या १३ बोकडांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:59 IST
म्हसदी : महावीर जयंतीदिनाचे औचित्य साधून सरपंच दीपक जैन यांचा उपक्रम
नवसपूर्तीसाठी भक्तांनी दिलेल्या १३ बोकडांना जीवदान
ठळक मुद्देdhule