धुळे बंदला अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:49 IST2020-01-24T12:49:28+5:302020-01-24T12:49:56+5:30
दैनंदिन व्यवहार सुरळीत, पोलिसांचा बंदोबस्त

धुळे बंदला अत्यल्प प्रतिसाद
धुळे : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या देशव्यापी बंदला शुक्रवारी सकाळी धुळ्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
धुळे शहरासह देवपूरात सर्व दुकाने सुरू होती़ दैनंदिन व्यवहार सुरळीत होता. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर देखील दुपारी १ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
दुपारी २ वाजेच्या सुमाराला वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात येईल; त्यावेळी काही प्रमाणात फरक पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.