शाळा सुरू कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:14+5:302021-09-23T04:41:14+5:30
कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. मात्र, आता ही लाटही ओसरलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने ग्रामीण भागात ...

शाळा सुरू कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविणार
कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. मात्र, आता ही लाटही ओसरलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने ग्रामीण भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केलेले आहे. मात्र, प्रथम सत्र संपत आले तरी अद्याप प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ॲानलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी मोाबईल रेंजची समस्या असल्याने, विद्यार्थ्यांना धड शिक्षण मिळत नाही. शिक्षक गावात जातात, मात्र विद्यार्थी घरी नसतो. अशी अवस्था झालेली आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्यातील बाजारपेठा, दुकाने, लग्नसोहळे, नेत्यांच्या सभा आदी सुरू झालेल्या आहेत. मात्र, प्राथमिक शाळा सुरू करण्यात संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. राज्यातील शाळा सुरू करण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे २३ सप्टेंबर ते २३ ॲाक्टोबर २०२१ या कालावधीत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शाळा सुरू करण्यासंदर्भात मागणी करणार आहे.
जिल्ह्यातून ५ हजार पत्रे पाठविणार
शिक्षक समितीतर्फे पालक व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांना पोस्टकार्ड देण्यात येणार आहेत. पोस्टकार्डवर मुख्यमंत्री महोदय, कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. आमच्या मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे, होत आहे. आमच्या मुलांचे शिक्षण सुरू होण्यासाठी अत्यंत लवकर शाळा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलेली आहेत.