शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

धुळे तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींना ४६ लाख भरण्यासाठी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 4:25 PM

अक्कलपाडा प्रकल्प पाणी आरक्षण : थकीत रक्कम तातडीने भरण्याचे पाटबंधारे विभागाने दिले आदेश

ठळक मुद्देपांझरा नदी किनारी असलेल्या गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पांझरा नदी काठावरील ग्रामस्थांनी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.मात्र, पाटबंधारे विभागाने एकूण थकबाकी पैकी ५० टक्के थकीत रक्कम जमा करण्याची अट घातल्यामुळे आता ज्या गावांसाठी आरक्षित पाणी आहे. त्या गावाच्या ग्रामपंचायतींनी ही रक्कम भरणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाणी आरक्षणाची एकूण थकबाकी ९७ लाख ९१ हजार इतकी झाली आहे. पैकी ५० टक्के रक्कम अर्थात ४५ लाख ९६ हजार रुपये तातडीने भरावे,  असे आदेश पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ज्या ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. अशा गावातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी पत्र दिले जाणार आहे.अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीकडून बिगर सिंचन पाणीपट्टी वसूल करून ही रक्कम पाटबंधारे विभागाला दिली जाते. त्यानुसार संबंधित ३३ गावांना अक्कलपाडा धरणातून पाणी हे सोडले जाते. परंतु, गेल्यावर्षी व यंदा अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी अद्याप जमा केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, तब्बल ९७ लाख ९१ हजार इतकी थकबाकी थकली आहे.थकबाकी भरल्याशिवाय आवर्तन सोडणार नाही नुकतेच धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना पत्र दिले आहे. एकूण थकबाकी पैकी ५० टक्के रक्कम तातडीने जमा करण्याचे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ४५ लाख ९६ हजार पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागणार आहे. ही रक्कम जमा होत नाही; तोपर्यंत अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडणार नाही, असा इशारा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.  गेल्यावर्षी दहा लाख भरले सन २०१६-२०१७ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा, अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील गावांना २०० दलघफु पाणी आरक्षित केले होते. प्रत्यक्ष अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सन २०१६-२०१७ या वर्षात दोन आवर्तनासाठी ४६२ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. तसेच पाणी आरक्षणाची पाणीपट्टी ही ४१ लाख ४५ हजार इतकी झाली होती. मात्र, ३१ मार्च २०१७ पर्यंत १० लाखाची थकबाकी जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, २०१७-२०१८ या कालावधिसाठी जिल्हाधिकाºयांनी ४६२ दलघफू पाणी आरक्षित केले असून पहिल्या आवर्तनास २७६ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. या पाण्याची आकारणी २४ लाख ७६ हजार इतकी आहे. तसेच गेल्या वर्षाची ३१ लाख ७० हजार व चालू आकारणी ६६ लाख २१ हजार अशी एकूण ९७ लाख ९१ हजार इतकी पाणीपट्टी थकीत झाली आहे. 

या गावांसाठी आहे पाणी आरक्षितनवे भदाणे, जुने भदाणे, नेर, अकलाड, मोराणे प्र नेर, खेडे, वार, कुंडाणे वार, मोराणे प्र. ल., वलवाडी, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, नकाणे, कुसुंबा, मेहेरगाव, कावठी, बिलाडी, भोकर, निमडाळे, निमखेडे, शिरधाणे प्र. डां, जापी, न्याहळोद, मोहाडी प्र. डां, विश्वनाथ, सुकवड, कौठळ, हेंकळवाडी, तामसवाडी, कापडणे, कुंडाणे (वरखेडे), लोणखेडी, नांद्रे  

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे