धुळे जिल्ह्यातील ४०० शाळांना दिले कोरोनाविषयी जनजागृतीचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:58 IST2020-03-13T11:58:18+5:302020-03-13T11:58:43+5:30
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा उपक्रम

धुळे जिल्ह्यातील ४०० शाळांना दिले कोरोनाविषयी जनजागृतीचे पत्र
आॅनलाइन लोकमत
धुळ :गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, महाराष्टÑात काही संशयित रूग्ण आढळल्याने, माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुमारे ४०० माध्यमिक शाळा, व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सूचना देत जनजागृती सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थींच्या आरोग्यविषयी काळजी घेण्याच्या सुचना शाळांना पत्रकाद्वारे दिल्या दिल्या आहेत.
विद्यार्थी आजारी असल्यास त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी द्यावी असे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिल. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, खोकला, किंवा ताप आला असेल तर त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात यावी. सर्दी खोकला झालेल्या विद्यार्थींना इतर विद्यार्थींमध्ये न मिसळने नाक, डोळे, तोंड यांना वारंवार हात न लावणे, आजारी व्यक्तीपासून लांब राहावे, जवळच्या दवाखान्यात भेट देऊन तपासणी करावी, आपले हात वारंवार सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवुन स्वच्छ करावेत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.