संकटात खचून न जाता रुग्णसेवा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:19+5:302021-05-14T04:35:19+5:30
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कितीही संकटे आली तरी ...

संकटात खचून न जाता रुग्णसेवा करू
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कितीही संकटे आली तरी संकटांना घाबरून खचून न जाता रुग्णसेवा करण्याची प्रतिज्ञा यावेळी परिचारिकांनी घेतली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कमी परिचारिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिसेविका अरुणा भराडे यांनी फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सहाय्यक अधिसेविका कविता आहिरे, सहाय्यक अधिसेविका आशा बागुल तसेच परिचारिका संवर्गातील काही परिचारिका उपस्थित होत्या.
कोरोना काळात रुग्णसेवा देताना संक्रमित होऊन ज्या परिचारिकांनी आपले जीव गमावले व ज्या परिचारिकांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू झाले, त्या सर्वांसाठी दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष अरुणा भराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सोनवणे यांनी केले.