आरोग्य केंद्रात कमी मनुष्यवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:49+5:302021-04-06T04:34:49+5:30
मालपूर गावात रुग्ण कोरोनाबाधित असून, यात दररोज भर पडताना दिसून येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य ...

आरोग्य केंद्रात कमी मनुष्यवळ
मालपूर गावात रुग्ण कोरोनाबाधित असून, यात दररोज भर पडताना दिसून येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड अँटिजेन अहवालात दिवसागणिक सहा सात रुग्ण बाधित निघत असल्याने येथील आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. अशात गाव कोरोना हाॅटस्पाॅटच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन त्वरित मनुष्यबळाचा पुरवठा करावा.
मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला १२ गावे जोडली असून, मालपूर. सहवाडी, तारे, सुराय, कर्ले, परसोळं, देवी, वाडी, रुदाणे, गैरमहसुली देवकानगर, कलवाडे, चुडाणे, आदी गावे जोडली असून, कोरोना रुग्णसंख्या येथेही आहे. यात देवी व मालपूर येथील मोहनशेठ नगरात दोन उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. सुराय व कर्ले येथेदेखील त्वरित आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करावी.
मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे मनुष्यबळ
मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे मनुष्यबळ असून, त्यात रेग्युलर सेवा, लसीकरण कार्यक्रम, कोरोना लसीकरण, कोरोना सनियंत्रणची कामे करण्यासाठी मोठा ताण पडत आहे, असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी सांगितले.
मंजूर व रिक्त पदे.
२ वैद्यकीय अधिकारी, २ आरोग्य सहायक, २ आरोग्य सेविका, १ बहुविध आ सेवक व १ औषध निर्माण अधिकारी. त्यांनाही शिरसोला येथे ३ दिवस प्रतिनियुक्तीवर काम पाहावे लागते. तरी ७ लोकांच्या माध्यमातून २८ हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा देणे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे उपकेंद्रांची संख्या वाढवून मिळाली, तरच चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा देता येईल. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.