चिंचखेडे येथे बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:00 IST2020-09-21T19:58:24+5:302020-09-21T20:00:06+5:30
म्हसदी : शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला पंचनामा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : साक्री तालुक्यातीलम्हसदी ते चिंचखेडे रस्त्यावरील शेतात असलेल्या कांदा चाळीत बिबट्याने धुमाकूळ घातला.बिबट्याने एक वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. रात्रभर बिबट्याचा मुक्काम कांदा चाळीत होता. सकाळी या बिबट्याने एका शेतकºयावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
म्हसदी ते चिंचखेडे रस्त्यावरील चिंचखेडे पाटगण शिवारांमध्ये अशोक लकडू पाटील शेत असून त्याठिकाणी त्यांची कांदाचाळ आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बछड्यासह मादी बिबट्याने कांदाचाळीत प्रवेश केला.कांदाचाळीजवळ असलेला १ वर्षाच्या गोºहाला बिबट्याने फस्त केले. सकाळी अशोक पाटील यांचा मुलगा रमाकांत पाटील हा शेतात दूध घेण्यासाठी गेला असता त्याठिकाणी बिबटयाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
भयभीत झालेल्या रमाकांतने परिसरातील शेतकºयांना आवाज दिला. शेतकºयांची गर्दी झाल्याने बिबट्या अधिकच चवताळला. शेतकºयांनी कांदा चाळीचे तार काढताच बिबट्याने बछड्यांसह अक्कलपाडा धरणकडे धूम ठोकली या घटनेची माहिती मनोहर पाटील यांनी वन विभागात दिली. सकाळी वन विभागाचे वनरक्षक एल. आर. वाघ, वन कर्मचारी वसंत खैरनार, एकनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
यावेळी संजय पाटील, उमेश पाटील, राकेश मिस्त्रीग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने, परिसरामध्ये शेती करणं हे कठीण झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.