शिरुडला एलसीबीने रोखली टँकरमधून पेट्रोल, डिझेलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 11:24 IST2020-04-26T11:23:56+5:302020-04-26T11:24:29+5:30

१२ लाख ६ हजाराचा मुद्देमाल : चार जणांविरुध्द गुन्हा

LCB stops theft of petrol, diesel from tanker | शिरुडला एलसीबीने रोखली टँकरमधून पेट्रोल, डिझेलची चोरी

शिरुडला एलसीबीने रोखली टँकरमधून पेट्रोल, डिझेलची चोरी

धुळे : तालुक्यातील शिरुड येथील एका हॉटेलच्या मागे अवैधरित्या टँकरमधूर पेट्रोल आणि डिझेलची चोरी करुन विक्री होत असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला़ ही कारवाई शनिवारी दुपारुन करण्यात आली असून १२ लाख रुपयांचा ट्रक आणि ६ हजाराचे अन्य साहित्य असे एकूण १२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ याप्रकरणी सुपडू बापूराव पाटील, मधुकर सुकलाल पाटील, राजेंद्र दौलत गायकवाड आणि रशीद बाबु बागवान या संशयितांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे़

Web Title: LCB stops theft of petrol, diesel from tanker