एलसीबीने पकडला दीड कोटींचा गुटखा, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 15:02 IST2021-05-13T15:02:47+5:302021-05-13T15:02:57+5:30
महामार्गावर संशयास्पद थांबलेल्या तीन ट्रकांची तपासणी

एलसीबीने पकडला दीड कोटींचा गुटखा, तिघांना अटक
धुळे : शहरानजिक महामार्गावर संशयास्पद थांबलेल्या तीन ट्रकांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी केली असता त्यात विमल गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. १ कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा गुटखा आणि १५ लाखांचे तीन ट्रक असा एकूण १ कोटी ५२ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहरानजिक एका हॉटेलजवळ ट्रक उभा असून त्यात गुटखा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार पथकाला पाठवून खात्री केली असता एमएच ४८ बीएम ३७१३ आणि एमएच ४८ एजी ३७१८ क्रमांकाचे दोन ट्रक आणि साक्री रोडवरील नेर गावाजवळून एमएच ४८ एवाय ३९२९ क्रमांकाचा ट्रक असे एकूण ३ ट्रक चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. ही कारवार्ई बुधवारी रात्री झाली. ट्रकांची तपासणी केली असता प्रत्येक ट्रकमध्ये ४५ लाख ७६ हजार प्रमाणे १ कोटी ३७ लाख २८ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. एका ट्रकची किंमत ५ लाख रुपये प्रमाणे तीन ट्रकांची किंमत १५ लाख असे एकूण १ कोटी ५२ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महेंद्र रामनवल तिवारी (४०), प्रमोद जटाशंकर उपाध्याय (३५) आणि गोवर्धन जंगीलाल गौड (२६) (तिघेही रा. उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली. हा सर्व मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आलेला आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुशांत वळवी, योगेश राऊत, कर्मचारी श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदिप थोरात, सुनील विंचुरकर, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, संजय पाटील, संदिप पाटील, रविंद्र माळी, संतोष हिरे, संदिप सरग, प्रकाश सोनार, अशोक पाटील, गौतम सपकाळे, हेमंत सोनवणे, मनोज पाटील, चेतन कंखरे, उमेश पवार, विशाल पाटील, राहुल सानप, रवि राठोड, मनोज बागुल, महेश मराठे, तुषार पाटील, श्रीशैल जाधव, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली.