धुळे : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी वसुलीची कारवाई महापालिकेकडून सुरु झाली़ काही व्यापाऱ्यांना नोटीसाही पाठविण्यात आल्या़ तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी वसुलीला स्थगिती देऊनही कारवाई होणार असल्यामुळे व्यापाºयांमध्ये रोष व्यक्त झाला़ हा रोष अधिक वाढू नये यासाठी खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली़ त्यात २६ जानेवारीपर्यंत वसुलीच्या कारवाईला तात्पुरता स्थगिती देण्यात आली़ दरम्यान, प्रशासन आणि व्यापाºयांची बैठक होऊन सुवर्णमध्य काढण्यावर गुरुवारच्या बैठकीत एकमत झाले़महापालिकेच्या सभागृहात एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर याबाबत बैठक घेण्यात आली़ याप्रसंगी खासदार डॉ़ सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त अजीज शेख, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, उपमहापौर कल्याणी अंपळकर, विरोधी पक्ष नेते साबीर खान, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडीया, सुनील रुणवाल, दीपक भावसार, जितेंद्र चौवटीया, सुरेश कुंदनानी, सुभाष कोटेचा, अजय नाशिककर, विक्रम राठोड यांच्यासह अन्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़बैठकीच्या सुरुवातीला नितीन बंग यांनी व्यापाºयांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली़ शासनाने एलबीटी हा कर ६ जुलै २०१३ रोजी सुरु केला आणि ३१ जुलै २०१५ रोजी बंद करण्यात आला़ दरम्यानच्या काळात तरीही कराची वसुली होत असल्याने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाºयांनी २१ आॅगस्ट २०१८ रोजी आपल्या वेदना कथन केल्या होत्या़ यावेळी तात्काळ काहीतरी मार्ग काढण्यात यावा अणि तोपर्यंत एलबीटीची सक्त वसुली करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते़ असे असताना मात्र, १६ डिसेंबर २०१९ पर्यंत थकीत कर भरण्याचे आणि कर न भरल्यास परिणाम भोगण्याचे आवाहन व्यापाºयांना महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या नोटीसीद्वारे करण्यात आले़ नोटीस मिळताच व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे़ स्थगिती असताना पुन्हा वसुलीचा घाट पुन्हा का घातला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली़आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले, नियमानुसार एलबीटी वसुलीच्या फाईल्स क्लियर करणे आवश्यक आहे़ ही प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत असे प्रकार सुरु राहतील़ व्यापाºयांनी यात सहकार्य करावे, प्रशासन आपल्या सोबत राहील़ शहरात ४ हजार ९१७ नोंदणीकृत व्यापारी आहेत़ पैकी ४१२ व्यापाºयांच्या फाईल पूर्ण झाल्या आहेत़ उर्वरीत ३ हजार ७७८ फाईल क्लोज होणे बाकी असल्याचेही आयुक्तांनी सांगितले़खासदारांनी केली मध्यस्थीएलबीटी संदर्भात मनपा प्रशासन आणि व्यापारी आमने सामने आले असताना सुवर्णमध्य काढण्यासाठी खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली़ प्रशासन आणि व्यापारी यांनी संयुक्तपणे बसून बैठक घ्या आणि सुवर्णमध्य साधा असे सांगितल्यानंतर प्रशासन आणि व्यापारी या दोघांनीही मुकसंमती दर्शविली़ परिणामी वाद शमला़
एलबीटी वसुली, तात्पुरता स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:15 IST