तापी पुलावरून रात्री लक्झरी बस पाण्यात पडण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 08:22 IST2020-08-28T08:18:14+5:302020-08-28T08:22:31+5:30

पोलिसांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Lazari at night in Tapi river | तापी पुलावरून रात्री लक्झरी बस पाण्यात पडण्याचा अंदाज

Dhule

शिरपूर - धुळ्याकडून शिरपूरकडे भल्या पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून पाण्यात पडल्याची दुर्दैवी घटना पुन्हा घडली़ सदर वाहन नेमके कोणते ते समजू शकले नसले तरी लक्झरी बस असल्याची भिती व्यक्त केली जात आहे़.२८ रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान हे वाहन धुळ्याकडून येत असतांना सदर चालकाला डुलकी लागल्यामुळे तापी पुलाचे कठडे तोडून ते वाहन पाण्यात पडले़ सदरचे वृत्त महामार्ग पोलिसांना कळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी येवून पहारा ठेवला आहे़. मात्र तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने काहीच कळत नाही़.परंतु पुलाचे कठडे मोठ्या प्रमाणावर तुटल्यामुळे मोठे वाहन असल्याचा अंदाज केला जात आहे़.
 

Web Title: Lazari at night in Tapi river