Lawyer's Mobile Shut Down | वकिलाचा मोबाइल हिसकावून पोबारा 

वकिलाचा मोबाइल हिसकावून पोबारा 

धुळे : फोनवर बोलत असल्याची संधी साधून वकिलाच्या हातातील मोबाइल भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना देवपूर भागात घडली़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे़ 
येथील न्यायालयात कार्यरत असलेले अ‍ॅड़ उमाकांत घोडराज आपल्या मोबाइलवर बोलत असताना त्यांच्या पाठीमागून दोन जण भरधाव वेगाने दुचाकीवरून आले़ क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अ‍ॅड़ घोडराज यांच्या हातातून मोबाइल हिसकावून नकाणेच्या दिशेने पोबारा केला़ ही घटना नकाणे रोडवरील जिल्हा      शासकीय ग्रंथालय परिसरात गुरुवारी रात्री पावणेअकरा ते ११ वाजेच्या सुमारास घडली़ चोरटे ज्या दिशेने पळाले त्या भागातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरा आहेत़ पोलिसांनी त्याचा आधार घेण्याची गरज आहे़ 

Web Title: Lawyer's Mobile Shut Down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.