सदस्यांचा लस्सीवर ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:55 IST2019-05-15T22:52:09+5:302019-05-15T22:55:33+5:30
उपाययोजनांपूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लस्सीवर ताव

dhule
धुळे : जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे़ पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मात्र तालुक्यात टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत उपाययोजनांपूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लस्सीवर ताव मारला. तसेच या बैठकीला उपस्थित राहण्यास पत्रकारांना मज्जावही करण्यात आला.
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यासाठी शासन स्तरावरून बोअर व विहीर अधिग्रहण, टॅकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याचे आदेश देण्यात आले आहे़त जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर आढावा बैठक घेण्याच्या सुचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहे़
धुळे तालुका पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती सभापती अनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाºयांची बैठक घेण्यात आली़ यावेळी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते़
आढावा घेत टॅकरची वाढविण्याच्या दिल्यात सूचना
तालुक्याला दुष्काळाची झळ बसू लागल्याने ग्रामस्थांच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. नागरीकांना भेडसावणाºया पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ज्या गावांना टँकरने पाणी पूरवठा केला जातोय त्या गावांना पाणी कमी पडू लागल्याने त्याठिकाणी टँकरची संख्या दुप्पट करण्याचे निर्देश सभापती अनिता पाटील यांनी अधिकाºयांना दिले.
नऊ गावांसाठी टँकरचा प्रस्ताव
तालुक्यातील अजंग, हेंकळवाडी (स), नवे भदाणे, बोधगाव, मोघण, सावळीतांडा, वेल्हाणे, निमगुळ व हेंद्रुण या गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत.
नावरी, आर्णी आणि नंदाळे खु. या ठिकाणी अधिग्रहण सुरू आहे. ग्रामस्थांसाठी पाण्याचे नियोजन बाभूळवाडी येथील खाजगी विहीर, डेडरगाव तलाव, आर्णी येथील खाजगी विहीर आणि दिवाणमळा येथील खाजगी विहीरीवरून करण्यात आले आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या भिषण टंचाईला सामोरे जावे लागू नये़ यासाठी विविध उपाय योजना करण्याला प्राधान्य देण्यात याव्यात अशा सुचना सभापती अनिता पाटील यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.
या गांवाना टॅकरद्वारे पाणी
धुळे तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई आहे़ टंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे़ त्यात फागणे, वडजाई, तांडा कुंडाणे, बाबरे, जुन्नेर, सौंदाणे या गावांना दररोज पाणी पुरविण्यात येत आहे़ तर अंबोडे, मोरदड तांडा, मोरदड, धामणगाव, नगाव या गावांना खाजगी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे़