सावळदे येथील घरफोडीत ४० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:27+5:302021-07-07T04:44:27+5:30
राजेंद्रसिंग इंद्रसिंग राजपूत (रा़ सावळदे, ता़ शिरपूर) हे बदलापूर अंबरनाथ, जि. ठाणे येथे परिवारासह राहतात़ चोरट्यांनी १३ ...

सावळदे येथील घरफोडीत ४० हजारांचा ऐवज लंपास
राजेंद्रसिंग इंद्रसिंग राजपूत (रा़ सावळदे, ता़ शिरपूर) हे बदलापूर अंबरनाथ, जि. ठाणे येथे परिवारासह राहतात़ चोरट्यांनी १३ जून ते ३ जुलैच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ चोरट्यांनी आरामशीरपणे कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली़ ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व उर्वरित ३ हजार ५०० रुपयांची रोकड, असा एकूण ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़
राजेंद्रसिंग राजपूत हे गावी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले़ त्यांनी घरात प्रवेश केल्यावर कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी थाळनेर पोलिसांना कळविले़ याबाबत थाळनेर पोलिसात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास हवालदार भरत चव्हाण करीत आहेत़