आमोदे येथे लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:59+5:302021-07-02T04:24:59+5:30
३० रोजी रात्रीच्या सुमारास रूद्रश्वेर सुभाषसिंग राजपूत, रा. आमोदे हे परिवारासह घराचा दरवाजा आतून बंद करून झोपले होते. अज्ञात ...

आमोदे येथे लाखाची घरफोडी
३० रोजी रात्रीच्या सुमारास रूद्रश्वेर सुभाषसिंग राजपूत, रा. आमोदे हे परिवारासह घराचा दरवाजा आतून बंद करून झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूमधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत ४५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, तीन हजारांची एक ग्रॅम वजनाची सोन्याची नाकातील फुली, १२ हजारांचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील किल्लू व रोख ३० हजार रुपये असा एकूण ९४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
पहाटेच्या सुमारास रूद्रश्वेर यांचे वडील सुभाषसिंग राजपूत हे उठल्यावर त्यांना घराचा आतून लावलेला दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर बेडरूममधील दोन्ही कपाटे उघडी व त्यांच्यामधील सामान फेकलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरातील इतर मंडळींना घटना सांगितली. घटनेची माहिती डीवायएसपी अनिल माने व प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश फड यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
याबाबत रूद्रश्वेर राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोसई एन. बी. सोनवणे करीत आहेत.