देवपुरात एक लाखाची घरफोडी

By Admin | Updated: June 3, 2017 01:18 IST2017-06-03T01:18:27+5:302017-06-03T01:18:27+5:30

चोरीचे सत्र सुरूच : चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल

A lacquer burglar in Godpur | देवपुरात एक लाखाची घरफोडी

देवपुरात एक लाखाची घरफोडी

धुळे : शहरासह परिसरात चोरी, घरफोडी सत्र सुरूच असून चोरटय़ांनी देवपुरातील पुरुषोत्तम कॉलनीत बुधवारी रात्री घरफोडी करून रोख रकमेसह एक लाखाचे दागिने लंपास केल़े याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े
देवपुरातील पुरुषोत्तम कॉलनीतील प्लॉट क्रमांक 59 मध्ये राहणारे वाहनचालक संजय सोनूजी भडागे हे बुधवारी सायंकाळी            घर बंद करून बाहेर गेले                होत़े त्यादरम्यान चोरटय़ांनी संध्याकाळी 7़45 वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाचे फिट केलेले लॉक तोडून घरात प्रवेश केला़ बेडरूममधील लाकडी कपाटातून 40 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला़
याबाबत संजय भडागे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एच़ क़े जाधव करीत आहेत़

Web Title: A lacquer burglar in Godpur