प्लॅटफॉर्मवर प्राथमिक सुविधाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:14 IST2019-06-10T14:13:52+5:302019-06-10T14:14:26+5:30

दोंडाईचा रेल्वे स्टेशन : नूतनीकरणासोबतच प्राथमिक सुविधा पुरविणेही गरजेचे

 Lack of basic facilities on the platform | प्लॅटफॉर्मवर प्राथमिक सुविधाचा अभाव

dhule

रवींद्र चौधरी।
दोंडाईचा : सुरत - भुसावल रेल्वे लाईनवरील दोंडाईचा स्टेशनवर मुंबई जाण्यासाठी नवीन गाडी, व लांब पल्याचा तीन प्रवाशी गाड्याना थांबा मिळाला असतानाच प्रवासी गाड्याचा थांबा असलेल्या मधल्या फ्लॅटफॉर्मवर अद्याप प्राथमिक सुविधा न पुरविल्याने रेल्वे प्रवाशात नाराजी जाणवते .
सुरत- भुसावल रेल्वे लाईनचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून या लाईनवरील लहान- मोठी सर्वच रेल्वे स्टेशन चकाचक झाली आहेत।उत्पन्नचा विचार न करता लोखंडी जिना,पाणी,शौचालय आदी सुविधा पुरविल्या असल्याने समाधान आहे . दोंडाईचा स्टेशनचे प्रवाशी उत्पन्न सुमारे सव्वा तीन कोटी रु असून सुमारे १२ प्रवासी गाडयाचे जा करतात.
मंत्री जयकुमार रावल प्रवाशी संघटना,सोशल क्लब यांचा मागणीनुसार माजी मंत्री डॉ सुभाष भामरे यांचा अथक प्रयत्नातून दोंडाईचा रेल्वे स्टेधनवर तीन लांब पल्याचा प्रवाशी गाड्या व नवीन मुंबई जाण्यासाठी खान्देश गाडी ला दोंडाईचा रेल्वेस्टेशनवर थांबा मिळाला आहे .गेल्या पन्नास वर्षात प्रथमच या मार्गावरून जाणा?्या प्रवाशी गाड्याना थांबा मिळाला असल्याने प्रवाशात समाधान व्यक्त होत आहे .
दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर तीन फ्लॅटफॉर्म आहेत।यातील मधला फ्लॅटफॉर्मवर म्हणजे 2 क्रमांकाचा फ्लॅटफॉर्मवर भुसावल कडे जाणाऱ्या प्रवासी गाडया थांबतात. या फ्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लोखंडी जिन्याने जावे लागते. स्टेशन तर चकाचक झाले. परंतु या फ्लॅटफॉमवर अद्याप प्राथमिक सुविधा नाहीत. आॅक्टोबर महिन्यात या फ्लॅटफॉर्मवर सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी संघटनेला व सोशल क्लब चा पदाधिकाºयांना दिले होते. गेल्या सात महिन्यात याबाबत अद्याप सुविधा नाहीत. त्यामुळे प्रवाशात तीव्र नाराजी जाणवत आहे. दोन व तीन क्रमांकाचे फ्लॅटफॉर्म जॉइंट असून यावर दिवसातून साधारणत: आठ वेळा गाडी थांबते. या फ्लॅटफॉर्मवर अद्याप मुतारी, शौचालय सुविधा नाही. पाच रुपयात शुद्ध, थंड बॉटल पाणी नाही. संपूर्ण फ्लॅटफॉर्मवर छत नाही, पुरेसे बसण्यासाठी बाक नाहीत. किमान प्रवासी एक तास या फ्लॅटफॉर्मवर थांबतो. सार्वजनिक शौचालयाची गरज भासल्यास जिन्याने पहिल्या फ्लॅटफॉर्मवर जावे लागते. पण काहींना ते प्रकृतीमुळे शक्य नसल्याने जीवाची घालमेल करून प्रवास करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
वाढत्या प्रवासी गाडया व वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर डिजिटल रेल्वे टाईम टेबलची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

Web Title:  Lack of basic facilities on the platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे