साक्री तालुक्यात १६ वर्षीय मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:31+5:302021-06-18T04:25:31+5:30
धुळे : साक्री तालुक्यातील भाडणे गावातून जगदीश ऊर्फ दादू ईश्वर सूर्यवंशी (१६, रा. दातर्ती, साक्री) या मुलाचे गेल्या आठवड्यात ...

साक्री तालुक्यात १६ वर्षीय मुलाचे अपहरण
धुळे : साक्री तालुक्यातील भाडणे गावातून जगदीश ऊर्फ दादू ईश्वर सूर्यवंशी (१६, रा. दातर्ती, साक्री) या मुलाचे गेल्या आठवड्यात शनिवारी अपहरण झाल्याचा गुन्हा साक्री पोलिसांनी दाखल केला आहे.
याबाबत मुलाचे वडील ईश्वर निंबा सूर्यवंशी (४३, रा. दातर्ती, ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दादू हा घरात काहीएक न सांगता निघून गेला. गावासह आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. दरम्यान, दुपारी ४.३० वाजता ईश्वर सूर्यवंशी याच्या बहिणीचा फोन आला. त्यांनी सांगितले की, दादू भाडणे ता. साक्री येथे माझ्या घरी आला होता. लघुशंकेचे निमित्त सांगून गेला असून तो परतला नाही. त्यानंतर या सर्वांनी भाडणे तसेच साक्री येथे सर्वत्र शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. नातेवाईक आणि मित्रांना विचारपूस केली असता त्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे कुणीतरी त्याला घेऊन गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल जाधव करीत आहेत.